रांगोळीच्या माध्यमातून गणितीय संकल्पना मांडत गणित दिन साजरा.
वसमत विभागीय उपसंपादक प्राध्यापक अनिल कुमार मुगुटकर अँक्टिव्ह मराठी न्यूज वसमत


रांगोळीच्या माध्यमातून गणितीय संकल्पना मांडत गणित दिन साजरा.
वसमत.प्रतिनिधी. दिनांक 24 डिसेंब
बहिर्जी स्मारक महाविद्यालयात दि 22 डिसेंबर रोजी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे गणित दिन साजरा करण्यात आला . प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात रांगोळी च्या माध्यमातून गणितीय संकल्पना रेखाटण्यात आल्या . यामध्ये गणिताचे झाड, मॅजिकल नंबर इ. नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्यात आल्या. यामुळे गणिता मध्ये आवड निर्माण होऊन , हा अवघड विषय समजण्यास सोपा होईल अशी अपेक्षा यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नामदेव भोईवार यांच्या हस्ते भित्ती पत्रकाचे अनावरण करण्यात आले . या प्रसंगी विद्यार्थीना प्रा के सी देशमुख, डॉ अनिल मुगुटकर व प्रा एम व्ही आहेर यांनी गणिताचे महत्व सांगीतले. या कार्यक्रमाला प्रा अनिल नादरे सर, , प्रा गणेश डाखोरे सर श्रीमती कर्णेवार मॅडम, प्रा शिंदे सर , प्रा प्रमोद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती . या उपक्रमात अदिती बोंगाने, धनश्री कमळू, आरती बोराडे, निशा निलकंठ, उत्कर्षी कारले, सानेहा अली, गौरी जाधव, श्रद्धा कराळे या विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवीला . महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक यांनी या नवीन उपक्रमाचे कौतुक करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
ब्युरो रिपोर्ट, अनिल मुगुटकर, अँक्टिव्ह मराठी न्युज. वसमत हिंगोली.







