Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

नांदेड ते गिरगांव मार्गे पार्डी बागल बस सेवा सुरू करण्यासंदर्भात मा.नियंत्रक रा.प.महामंडळ नांदेड विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले.

जिल्हा विभागीय प्रतिनिधी रवींद्र कुंटे ॲक्टिव्ह मराठी न्यूज.

0 1 4 7 2 7

नांदेड ते गिरगांव मार्गे पार्डी बागल बस सेवा सुरू करण्यासंदर्भात मा.नियंत्रक रा.प.महामंडळ नांदेड विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले.
(ॲक्टिव्ह मराठी)जिल्हा विभागीय प्रतिनिधी – रवि कुंटे दि. 6 एप्रिल
हिंगोली गिरगाव / गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव मार्गावरील गिरगाव हि बस सेवा बंद पडली होती, या भागांतील अनेक विध्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, तसेच दवाखान्याच्या कामासाठी, बाजारपेठेत खरेदी विक्री साठी, व ईतर कोणत्याही कामासाठी बस प्रवास व्हावा या उद्देशाने किमान सकाळीं व सायंकाळी किमान दोन वेळा तरी बस फेरी सुरू करावी, जेणे करून सर्वांचे काम व प्रवास चांगला होईल, बस सेवा बंद पडली होती त्याचे मुख्य रस्त्याचे कारण होते, परंतू आता वाहतुकीसाठी रस्ता योग्य व सज्ज झाला असून, त्यानुसार गिरगाव, परजना, खा.वाडी, सोमठाणा, दाभडी, पार्डी ( बागल )बू येथील ग्राम पंचायत कार्यालयाचे ठराव व निवेदन पत्र यावेळी लेखी स्वरूपात देण्यात आले, तर यावेळी हिंगोली जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. विलासराव रायवाडे, गाव प्रतिनिधी तथा पत्रकार मा. प्रमोद नादरे, गिरगाव ग्राम पंचायत कार्यालयाचे लिपिक श्री. ज्ञानेश्वर डोके परिसरातील सर्व ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांचें निवेदना नुसार लवकरच बस सेवा सुरू करू असे आश्वासन यावेळी विभागीय नियंत्रक कार्यालय राज्य परिवहन महामंडळ नांदेड यांच्या वतीने देण्यात आले आहे.
ॲक्टिव्ह मराठी न्यूज जिल्हा विभागीय प्रतिनिधी रवि कुंटे वसमतनगर हिंगोली. परभणी. नांदेड.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे