बहिर्जी स्मारक महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन..
प्रतिनिधी डॉ. प्रा.अनिल कुमार मुगुटकर अँक्टिव्ह मराठी न्यूज.क्टिव्ह मराठी न्यूज वसमत हिंगोली

बहिर्जी स्मारक महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन..
वसमत.(प्रतिनिधि). दिनांक 3 फेब्रुवारी
येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात उद्या दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10वाजता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील करिअर गाइडन्स व प्लेसमेंट सेल, आयक्युएसी आणि इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकींग , फायनान्सीयल स्किल्स अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा नौकरी मार्गदर्शन व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदरील इंटरव्ह्यूमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बॅंक, कोटक महिंद्रा, येस बँक, बंधन बॅंक, आयडीएफसी फर्स्ट बॅंक, आरबीएल व डिसीबी अशा बॅंकेतील विविध पदांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आयबीएफएस अकॅडमीचे कोल्हापूर व पुणे येथील प्रतिनिधी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मुलाखती घेणार आहेत.तरी महाविद्यालयातील पदवी प्राप्त माजी विद्यार्थी व सध्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. अनिल मुगुटकर, समन्वयक , यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मा.मा. जाधव यांनी केले आहे.
ब्युरो रिपोर्ट,अनिल मुगुटकर, ॲक्टिव्ह मराठी न्युज,वसमत, हिंगोली.







