पतंग उडविताना सावधानता बाळगावी पत्रकार नाना जोशी यांचे आवाहन.. अँक्टीव्ह मराठी न्युज राहुरी प्रतिनिधी चंद्रशेखर दिघे.. जानेवारी महिना मधील नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत आता जवळ आला असून पतंग उडविणाऱ्या पंतग उडविताना सावधानता बाळगावी, काळजीपूर्वक वागावे असे आवाहन पत्रकार नाना जोशी यांनी केले आहे.मकर संक्रांत काळात आकाशात रंगीबेरंगी पतंग डौलाने डोलत असताना दिसतात.रस्त्यावर पादचाऱ्यांना, सायकल स्वारांना,बाईक स्वरांना, पतंगाच्या मांज्या मुळे शरीरावर घासल्याने जखम होते, वेदना होतात.कट झालेल्या पतंगाला पकडण्यासाठी लहान मुले बांबू घेऊन रस्त्यावर, इमारतीच्या गच्चीवर, झाडावर, खांबावर,तारेवर इकडून तिकडे बेसावध पणे धावत असतात.यामध्ये लहान मोठा अपघात होऊ शकतो.नंतर आपणाला प्रसार माध्यमांतून अपघात झाल्याचे कळते.नायलान च्या मांज्याला बंदी असताना सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री होत आहे.ईमारतीच्या गच्चीवर बेसावधपणे धावत पतंग पकडणारी मुले पडून जखमी होतात, खाली पडुन मरण ही पावतात.कधी कधी पादचाऱ्यांची, बाईक स्वारांची मान कापण्याची घटना घडल्या आहेत.आकाशात उडणारे पक्षी, झाडावर बसलेले पक्षी, तारेवर बसलेले पक्षी मांज्याचा शिकार होतात, त्यांच्या पंखांना,पायाना,मानेला मांजा गुंडाळला जाऊन इजा होते.वेळेवर सुटका न झाल्यास त्यांचा मृत्यू ही होऊ शकतो, मांजा मध्ये अडकलेले पक्षी तडपतान दिसतात.अग्निशामन दल किंवा पक्षी प्रेमी संघटना पाचारण करावे लागते.यासाठीच पतंग उडविणाऱ्या पंतग प्रेमीने पतंग उडविण्याचा आनंद जरूर घ्यावा पण सावधानता बाळगावी, असे आवाहन अँक्टीव्ह मराठी न्युजचे उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी यांनी केले..


प्रतिनिधी चंद्रशेखर दिघे.. जानेवारी महिना मधील नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत आता जवळ आला असून पतंग उडविणाऱ्या पंतग उडविताना सावधानता बाळगावी, काळजीपूर्वक वागावे असे आवाहन पत्रकार नाना जोशी यांनी केले आहे.मकर संक्रांत काळात आकाशात रंगीबेरंगी पतंग डौलाने डोलत असताना दिसतात.रस्त्यावर पादचाऱ्यांना, सायकल स्वारांना,बाईक स्वरांना, पतंगाच्या मांज्या मुळे शरीरावर घासल्याने जखम होते, वेदना होतात.कट झालेल्या पतंगाला पकडण्यासाठी लहान मुले बांबू घेऊन रस्त्यावर, इमारतीच्या गच्चीवर, झाडावर, खांबावर,तारेवर इकडून तिकडे बेसावध पणे धावत असतात.यामध्ये लहान मोठा अपघात होऊ शकतो.नंतर आपणाला प्रसार माध्यमांतून अपघात झाल्याचे कळते.नायलान च्या मांज्याला बंदी असताना सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री होत आहे.ईमारतीच्या गच्चीवर बेसावधपणे धावत पतंग पकडणारी मुले पडून जखमी होतात, खाली पडुन मरण ही पावतात.कधी कधी पादचाऱ्यांची, बाईक स्वारांची मान कापण्याची घटना घडल्या आहेत.आकाशात उडणारे पक्षी, झाडावर बसलेले पक्षी, तारेवर बसलेले पक्षी मांज्याचा शिकार होतात, त्यांच्या पंखांना,पायाना,मानेला मांजा गुंडाळला जाऊन इजा होते.वेळेवर सुटका न झाल्यास त्यांचा मृत्यू ही होऊ शकतो, मांजा मध्ये अडकलेले पक्षी तडपतान दिसतात.अग्निशामन दल किंवा पक्षी प्रेमी संघटना पाचारण करावे लागते.यासाठीच पतंग उडविणाऱ्या पंतग प्रेमीने पतंग उडविण्याचा आनंद जरूर घ्यावा पण सावधानता बाळगावी, असे आवाहन अँक्टीव्ह मराठी न्युजचे उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी यांनी केले..







