Breaking
ब्रेकिंगसामाजिक

स्वाभीमानी लहुजी सेनाआमरण उपोषण भ्रष्ट अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी*

0 1 4 7 2 7

स्वाभीमानी लहुजी सेनाआमरण उपोषण भ्रष्ट अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी*

बारामती (प्रतिनिधी) दिनांक १९ जुलै.गुरुवार दि.१८/०७/२०२४ रोजी दुपारी १२ – ०० वा. पासून
प्रमुख मागण्या विदर्भात:
१. निमगांव केतकी ता. इंदापूर, जि. पुणे येथील ऑनलाईन व्यावसायीक यांनी बांधकाम मजूर यांचे अर्ज भरतेवेळी जी खोटी व दिशा भूलकरणारी कागदपत्रे जोडून जी शासनाची फसवणूक केली, त्याबद्दल त्यांचेवर आपल्या कार्यालयामार्फत फौजदारी कलमाअंतर्गत गुन्हा
दाखल करण्यात यावा.
२. निमगांव केतकी येथील ऑनलाईन व्यावसायीकांनी बांधकाम मजूरांचे अर्ज भरतेवेळी ज्या ठेकेदाराचे प्रमाणपत्र जोडले ते ठेकेदार
नोंदणीकृत आहेत का ? त्या ठेकेदाराने महाराष्ट्र सेल्स टॅक्स डिपार्टमेंटचे पी.टी. आर. व पी.टी.सी. भरणा क्लेरंस केला आहे का ?सदरच्या कामगारांना बँक खात्यातून पगार दिला गेला आहे का ? व त्यांच्या नांवे कामगार कायद्यानुसार दरमहा कपात होणारापी.एफ.,ई.एस.आय. कपात केला जातो का ? सदरच्या ठेकेदाराने कामगाराचा विमा उतरविला आहे का ? सदरचे जे कामगार या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी बांधकाम कामगारांचे प्रशिक्षण कोठे घेतले ? त्याबाबत त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे का ? इत्यादी
बाबींची खात्री व पडताळणी करुन खऱ्या बांधकाम मजूरास लाभ मिळावा.
३. बारामती येथील नोंदणीअधिकारी श्री. शंकर बारवकर व निमगांव केतकी येथील ऑनलाईन व्यावसाय यांचे लागेबंध आहेत की कसे ?हे पाहण्यासाठी शंकर बारवकर व ऑनलाईन व्यावसायीक यांचे मोबाईल लोकेशन व सी. डी. आर. तपासण्यात यावेत. तसेच बारवकर यांनी शासनास दरवर्षी सादर केलेल्या आयकर विवरण पत्राप्रमाणे त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नांवे असलेल्या स्थावर जंगम
मालमत्तेची ए.सी.बी.च्या सक्षम पथकामार्फत कसून चौकशी करण्यात यावी व श्री. शंकर बारवकर यांना पदमुक्त करण्यात यावे.
४. या योजनेसाठी पात्र लाभार्थीस शासन नियमाप्रमाणे फक्त १ रुपयामध्ये संसार उपयोगी वस्तूंचे कीट, पेटी वाटप करण्यात यावे व
निमगांव केतकी येथील ऑनलाईन सेंटर चालकांनी जी गरजू, भोळ्या भाबड्या बांधकाम मजूरांकडून जी लूट केली, ती त्यांनी लूट
केली जास्तीची रक्कम संबंधीत बांधकाम मजूरास परत करणेबाबत आपल्या कार्यालयामार्फत ठोस उपाय योजना करण्यात यावी.
उपोषणकर्ते : श्री. संतोष रामदास मोरे
(संस्थापक-अध्यक्ष, स्वाभीमानी लहुजी सेना महाराष्ट्र राज्य)
व स्वाभीमानी लहुजी सेना कार्यकर्ते
स्थळ : मा.अप्पर कामगार आयुक्त सो. म.इ.इ.बां. का. क.मंडळ संगमवाडी – पुणे या कार्यालयासमोरील
आमरण उपोषण नोंदणी अधिकारी सो. म.इ.इ. बां. का. क.मंडळ बारामती या कार्यालया समोर या मागण्या साठी उपोषण चालु आहे
*बारामती विभागीय शहर संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती*.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे