Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचा ग्रंथप्रदर्शनाने प्रारंभ.

तालुका प्रतिनिधी नरहरी शहाणे अँक्टिव्ह मराठी न्यूज शेवगाव

0 1 4 7 2 7

न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचा ग्रंथप्रदर्शनाने प्रारंभ

नरहरी शहाणे शेवगाव – येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमास सुरवात ग्रंथप्रदर्शनाने झाली. ग्रंथालय विभागामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत दि. ३० व ३१ डिसेंबर २०२४ वार सोमवार व मंगळवार या दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वाचनापासून दुरावत असलेल्या विद्यार्थ्यांना वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येणार आहे. यामध्ये ग्रंथप्रदर्शन, सामुहिक वाचन, पुस्तक परीक्षण, वाचन संवाद, कथन स्पर्धा, वाचन कौशल्य कार्यशाळा असे उपक्रम यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी डॉ. सुडके यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या प्रदर्शनात अभ्यासक्रमा व्यतिरिक्त पुस्तकांचा समावेश आहे जसे की, मराठी, हिंदी, इंग्रजी वाचन साहित्य, प्रत्येक विषयातील संदर्भ ग्रंथ, चरित्रात्मक पुस्तके, शब्दकोश, सरिताकोश, सांस्कृतिक कोश, विश्वकोश इ. या प्रदर्शनातून ग्रंथालयातील पुस्तक विद्यार्थ्याना हाताळण्यास मिळतात. विद्यार्थ्यांना जे पुस्तक आवडेल ते विद्यार्थ्यांना वाचनास मिळते यातून वाचक वाढतात आणि वाचन संस्कृती वाढण्यास मदत होते. वाचनाने व्यक्तिमत्व खुलते, वाचनाने व्यक्तिमत्वाचे भरणपोषण होते वाचन संस्कृतीच्या विकासाने सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते अशी माहिती ग्रंथपाल मिनाक्षी चक्रे यांनी दिली. या ग्रंथप्रदर्शनास विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनास डॉ. संदीप मिरे, सोपान नवथर महविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा. मिनाक्षी चक्रे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नंदू बर्डे, अयोध्या देवकर, प्रियांका वाघमारे याने परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे