

न्यू आर्टस् महाविद्यालयात कृषी विषयक कार्यशाळा संपन्न.
नरहरी शहाणे शेवगाव – येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसार समाज संचालित न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये आज शुक्रवार दि. २७/१२/२०२४ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा कम्युनिटी कॉलेज व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचा विषय “हायटेक कांदा लागवड शेती” असा असून, प्रमुख पाहुणे म्हणून कृषीरत्न बाबासाहेब पिसोरे उपस्थित होते. पिसोरे यांनी हायटेक शेतीसंदर्भातील आधुनिक तंत्रज्ञान, कांद्याची उत्पादनवाढ, निर्यातक्षम शेती यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचे सखोल मार्गदर्शन केले.
तसेच, शेवगाव येथील कृषी अधिकारी वैष्णवी घुले, कृषी पर्यवेक्षक सुखदेव जमधडे व वाघोली गावचे सरपंच उमेशजी भालशिंग यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेचे अध्यक्ष ज्येष्ठ कृषीतज्ञ बापूसाहेब भोसले होते. यांनी मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाने उपस्थित शेतकरी बांधव प्रेरित होऊन या मार्गदर्शनाचा आपल्या शेतकी कामात वापर करून अधिक यशस्वी होतील असे मत कृषीतज्ञ भोसले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपस्थित शेवगाव तालुक्यातील शेतकरी बंधूंनी कृषी क्षेत्रातील विविध समस्यांच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.
महाविद्यालयातील प्राध्यापक व १४० विद्यार्थी यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यक्रमाची प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. संदीप मिरे यांनी केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. आश्विनी गोरखे यांनी केले तर आभार कार्यशाळेचे आयोजक प्रा. मंगेश रहिंज यांनी मानले. तसेच कार्यक्रमासाठी डॉ.संदीप मिरे , डॉ.छाया भालशंकर , प्रा. आकाश गायकवाड , प्रा. सचिन पवार , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सहाय्य केले. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. शेवगाव. अहिल्यानगर







