क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसापुरी येथे जयंती उत्साहात साजरी .
विभागीय उपसंपादक किशोर पवार अँक्टिव्ह मराठी न्यूज माजलगाव

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसापुरी येथे जयंती उत्साहात साजरी .
(अँक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी किशोर बी पवार माजलगाव विभागीय उपसंपादक .दिनांक.07.01.2025. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केसापुरी केंद्र सादोळा तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे #क्रांतीज्योती #सावित्रीबाई #फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीतांवर संस्कृत कार्यक्रम , बाल सभा व महिला मेळाव्याचे आयोजित करण्यात आले. सौ मीना विलास साळवे यांचा शाळेच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त त्यांनी शाळेला 2100/- रुपयाची मदत केली. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु. समीक्षा बाबासाहेब साळवे या विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त तिच्या पालकाने सर्व विद्यार्थ्यांना पेन वाटप केले. तसेच कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लाभले गावचे कर्तव्यदक्ष सरपंच मा. भारत आबा साबळे यांनी शाळेला 2100/- रुपयाची मदत केली. या कार्यक्रमासाठी माझी सरपंच श्री.विलास साळवे ,गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. दत्ताभाऊ सोळुंके सौ.गीता सोळंके (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती),श्री. लक्ष्मण कोरडे (ग्रामपंचायत सदस्य) श्री.रामेश्वर शिंगाडे(शाळा व्यवस्थापन समिती सदस्य) ,श्री.हर्षप खिल्लारे, श्री.सुंदरराव सोनवणे व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अँक्टिव्ह मराठी न्यूज







