Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

रस्ते बदलले म्हणजे शहर बदलले असे नाही तर काय म्हणाले आमदार संग्राम जगताप..

विभागीय उपसंपदिका संगीता खिलारी अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

रस्ते बदलले म्हणजे शहर बदलले असे नाही तर काय म्हणाले आमदार संग्राम जगताप..

अहिल्यानगर (प्रतिनिधी) संगीता खिलारी दिनांक ६ जानेवारी .नगर शहरातील विकास कामांमधून शहर नवा रुपाला आणायचे आहे. रस्ते बदलले म्हणजे शहर बदलले असे नाही आपण स्वतःला स्वयं लावून आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर करावा. आपल्या घरातील कचरा घंटागाडीतच टाकला पाहिजे. काही लोक प्लास्टिकच्या पिशव्यात कचरा भरून रस्त्यावर फेकून देतात ही बाब चांगली नाही. शहर विकासामध्ये नागरिकांची जबाबदारी तितकीच मोठी आहे :’ असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. गावडे मळा. गोकुळधाम येथे माझी नगरसेविका दिपाली बारस्कर यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलले होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की दहा वर्षापासून शहर विकासाचा घेतलेला ध्यास पूर्ण करण्यासाठी आपण काम करत असून महापालिकेचे आर्थिक परिस्थिती आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर.माजी नगरसेवक सतीश बारस्कर. योगेश दुबे यांच्यासह परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिपाली बारस्कर यांनी देखील यावेळी बोलताना सदर कामासाठी आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभले असे म्हटले आहे. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे