Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचा भव्य मेळावा संपन्न .

पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोदजी शितोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. केडगाव. दौंड पुणे

0 1 4 7 2 7

महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचा भव्य मेळावा संपन्न .
केडगाव दौंड (प्रतिनिधी) प्रमोद शितोळे पश्चिम विभागीय सहसंचालक .महाराष्ट्र वीज निवृत्त जेष्ट नागरिक संघांचा केडगाव विभागात दि. 10 01.25 रोजी शुक्रवारी बोरबल मंदिर येथे मेळावा संप्पन झाला. सुरवातीला श्रीं. प्रल्हाद भांडारकर यांनी श्रमिक गीत सादर केले. मेळाव्याचे अध्यक्ष मा. बाळासाहेब मारुती भोसले यांनी स्वीकारले. व्यास पिठावरच्या मान्यवाराचा परिचय श्री.नामदेव त्र्यंबक होले सेवा नी. पदाधिकारी यांनी करून दिला. व्यास पिठावर सर्वश्री. मा. जयं देशपांडे,उपाध्यक्ष, श्रीं. प्रल्हाद भांडारकर, सचिव महाराष्ट्र प्रदेश, स्थानिक जेष्ट पदाधिकारी मा. लक्ष्मण रासकर, पुंडलिक शिवरकर अन्य उपस्थित होते. सुरवातीला होलेसाहेब यांनी मेळावा कशासाठी घेतलं त्याची माहिती दिली. सेवा निवृत्ताचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्याची सोडवणूक होणे आवड्याक आहे, निवृत्त झाल्यानंतर स्थानिक कार्यालय दुर्लक्ष करते, त्यासाठी वीज निवृत्त जेष्ट नागरिक संघ स्थापन केला आहे.
तदनंतर व्यास पिठावर उपस्थित असलेले श्री. जयंत देशपांडे, श्रीं प्रल्हाद भांडारकर व अन्य पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मेळाव्यास श्रीं.प्रल्हाद भांडारकर, राज्य सचिव , यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र वीज निवृत्त जेष्ट नागरिक संघाची वैशहिष्टे सांगितले. संघटनेने निवृत करमच्यांना भ. नी. नी. चे पैसे मिळून दिलेत, 2001 सलापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेत, 2009 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना 2 वर्ष सर्व्हिस वेटेज मिळवून दिलेत, तसेंच रोजदार कामगार यांना त्याची सेवा विचारात घेऊन उपदांनाची रक्कम अदा करण्यात भाग पाडलेत. माहे. सप्टेंबर 22 मध्ये रोजंदारी काम करणार्यांना उपदानचि रक्कम द्यावी असे परिपत्रक काढण्यासाठी भाग पाडले. त्याप्रमाणे त्याची सेवा ग्राह्य धरून उपदानयाची रक्कम अदा केली. रोजदार कर्मचार्यांनी जेवढी सेवा केली असेल त्य प्रमाणे उपदान रक्कम द्यावी. परिपत्रकाचा सकारात्मक विचार न केल्यामुळे काही कर्मचारी वंचित आहेत, त्यान्च्यावर स्थानिक विभाग, अन्याय करीत आहे, असे दिसून येत आहे, त्यानां त्यान्च्या हक्काचे पैसे जर मिळाले नाहीत तर, विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असे मेळाव्यास संभोधित केले. त्यास कर्मचार्यांनी संमती दिली. कर्मचाऱ्याचे क्लेम जि. ओ. 74 सुद्धा प्रलंबित आहे, सेवा पुस्तकाची छायानकीत प्रत, ओळख पत्र अन्य प्रश्न्या आहेत. ते मिळवून घेण्यासाठी आंदोलन करावे लागेल, त्यासाठी तुमची साथ पाहिजे. यासाठी सर्व्यानी एकत्र येउ या आपल्या मांगण्या मान्य करून घेयू या असले आव्हान केले.
मेळावयाचे सांगता समारोप श्रीं बाळासाहेब मारुती भोसले, यांनी केले. कामगारांनी संघटनेच्या पाठीमागे उभे राहावे, त्याना साथ द्यावी व आपल्या मांगण्या मान्य करून घ्याव्यात. सर्वांचे आभार मानलेत. मेळाव्यास ऐकून 40 सदस्य उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री. गणेश मालवकर . मा. नामदेव होलेजी, मा. लक्षमन रासकर. मा. मुलाणीजी अन्य सभासदांनी प्रयन्त केलेत सर्व्याचे संघटनेतर्फे आभार..
प्रल्हाद भांडारकर, सचिव, महाराष्ट्र प्रदेश, म. वी. नी. जे. नागरिक संघ पुणे.
पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे, मो,9096984142 ॲक्टिव मराठी न्यूज. दौंड. पुणे.

4.5/5 - (2 votes)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे