Breaking
ब्रेकिंगसामाजिक

डॉ मा. मा. जाधव यांची बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती .

0 1 4 7 2 7

डॉ मा. मा. जाधव यांची बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती .
वसमत.(प्रतिनिधी).16 आक्टोबर
बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा डॉ एम एम जाधव यांना आज संस्थेचे उपाध्यक्ष ॲड मुंजाजीराव जाधव , सचीव मा . आमदार पंडितराव देशमुख यांनी बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती प्रमाणपत्र देवून सत्कार केला . आज त्यांनी पूर्णवेळ नवनिर्वाचित प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला . दिनांक 11 आक्टोबर रोजी झालेल्या मुलाखतीत निवड समिती तर्फे त्यांची निवड करण्यात आली होती. या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून ते सध्या कार्यरत होते. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत . अक्षरगाथा चे ( त्रैमासिक ) संपादक म्हणूनही ते काम पाहतात . डॉ एम एम जाधव यांची बहिर्जी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबदल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जयप्रकाशराव दांडेगावकर , उपाध्यक्ष माजी आमदार ॲड मुंजाजीराव जाधव , सचीव माजी आमदार पंडितराव देशमुख , कनिष्ठ महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष ॲड रामचंद्रराव बागल , संचालक ऊमाकांतराव शिंदे, संचालक नितिन महागावकर, संचालक प्रा अनिल नादरे , संस्थेचे प्रशासकीय अधिकारी बाबुराव खिल्लारे यांनी अभिनंदन केले . यावेळी उपस्थित प्राध्यापक , प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नवनिर्वाचित प्राचार्य डॉ एम एम जाधव यांचा सत्कार केला व पेढे वाटप करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
ब्युरो रिपोर्ट, अनिल मुगुटकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज, वसमत हिंगोली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे