Breaking
ब्रेकिंगसामाजिक

बारामती मध्ये महाराष्ट्राच्या नगर विकास विभाग, नगरपरिषद प्रशासन, संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पुणे जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा २०२४-२०२५ पार पडला ..

पुणे जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती

0 1 4 7 2 7

बारामती मध्ये महाराष्ट्राच्या नगर विकास विभाग, नगरपरिषद प्रशासन, संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पुणे जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा २०२४-२०२५ पार पडल्या .
बारामती प्रतिनिधी:- १३ जानेवारी २०२५ नगर विकास नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण पाहता यावर्षी पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांचा मानसिक तणाव दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या नगर विकास विभाग नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पुणे जिल्हास्तरीय संस्कृतीक व क्रीडा स्पर्धा सन.२०२४-२०२५ पार पडल्या. स्पर्धा आयोजित करण्याचा पहिला मान बारामतीला मिळाला. या अंतर्गत क्रिकेट, टेबल टेनिस, हॉलीबॉल, कबड्डी, बुद्धिबळ, डान्स टेबल,इ. खेळ खेळवले गेले. यामध्ये पुणे जिल्ह्यातून १६ नगरपालिका, नगरपंचायत, यांनी सहभाग घेतला होता. बारामती नगरपालिके कडून जिल्ह्यातून आलेल्या एकूण ५०० ते ६०० कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय बारामती. नगरपालिकेचे मुख्यअधिकारी महेश रोकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमास माननीय. श्री.अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. यांच्या हस्ते वितरण सोहळा पार पडला. विजयी संघाचं अभिनंदन करत सर्वांना पुढील यशस्वी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.व बारामती नगर परिषदचे भरभरून कौतुक केले. पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे