Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

आनंदनगरी म्हणजे भविष्यातील उद्योजकांची प्रयोगशाळा….. पोलीस निरीक्षक सुधीर वाघ.

विभागीय संपादक अनिल कुमार मुगुटकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज. वसमत

0 1 4 7 2 7

आनंदनगरी म्हणजे भविष्यातील उद्योजकांची प्रयोगशाळा…..
पोलीस निरीक्षक सुधीर वाघ.

वसमत..(प्रतिनिधी).. अनिल कुमार मुगुटकर विभागीय संपादक दिनांक 12 जानेवारी विद्यार्थ्यांना बालवयातच उद्योग व्यवसायाचे धडे दिले तर ते पुढे यशस्वी होतात .आनंदनगरी या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात दरवर्षी विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण दिले जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे यातूनच भविष्यातील नव उद्योजक घडतील असे मत येथील पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी व्यक्त केले.

वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कुलमध्ये वार्षिक स्नेह संमेलना निमित्त कबड्डी, खोखो, धावणे, क्रिकेट हॉलीबॉल,स्लोसायकल, लिंबू चमचा अशा विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. तर विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका याचा अनुभव मिळावा या उद्देशाने शाळेच्या स्काऊट गाईड विभागाच्या वतीने आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उदघाटक म्हणून पोलीस निरीक्षक सुधीर वाघ बोलत होते.
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.नामदेव दळवी,
योगशिक्षक अरविंद जाधव,
सकाळ चे तालुका बातमीदार पंजाब नवघरे,केंब्रीज विद्यालयाचे अध्यक्ष कुंडलिक बहिरे,मुख्याध्यापक राजेंद्र गरड, शाळेचे मुख्याध्यापक शंकर घोडके उपस्थित होते.
पुढे बोलताना वाघ साहेब म्हणाले की विद्यार्थी दशेत मिळालेली व्यवसायाचे शिक्षण भविष्यातले उद्योजक निर्माण करतील आणि उद्योजक आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून शासनास टॅक्स भरतील आणि टॅक्स च्या माध्यमातून या देशाचा विकास होईल. त्यामुळे उद्योजक आणि ग्राहक हे शिक्षण शालेय पातळीवर मिळणे गरजेचे आहे .ते मिळवून देण्याचे काम संबंधित शाळा करत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राम ढोरे यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांनी इडली, वडापाव, समोसा, चने, भेळ, चिवडा, पापड, ब्रेड पकोडा, मुगवडा, गाजर हलवा अशा विविध पदार्थांचे तर बोर, टहाळ, बोरकूट अशा शेती संबधीत पण गोष्टी विक्री साठी ठेवल्या होत्या.विद्यार्थ्यांनी एकूण 50 स्टॉल लावले होते. सर्व स्टॉलवरील पदार्थ एका तासात विद्यार्थ्यांनी फस्त केले. शाळेतील 50 स्टॉल मधील सर्व विद्यार्थ्यांनी एक लाखाच्या वर खरी कमाई केली.
विद्यार्थ्यांनी मिळवलेला उत्पन्नातून खर्च वजा जाता शिल्लक उरलेले रक्कम शिक्षणाच्या कामी आणण्याचे अभिवचन यावेळी दिले.विद्यार्थ्यांना विविध पदार्थांचा आस्वाद घेता आला तर स्टॉलधारक विद्यार्थ्यांना विक्रीतून व्यवसायाचा अनूभव मिळाला.
ब्युरो रिपोर्ट,अनिल मुगुटकर, एक्टिव मराठी न्युज, वसमत, हिंगोली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे