Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करावीत- उपविभागीय अधिकारी प्रसाद मते .

तालुका प्रतिनिधी नरहरी शहाणे अँक्टिव्ह मराठी न्यूज. शेवगाव अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करावीत- उपविभागीय अधिकारी प्रसाद मते .

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) नरहरी शहाणे. विद्यार्थ्यांला श्रमसंस्कार, समाजसेवा, नेतृत्त्वगुण राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिरातून मिळत असते. या शिबिरातून आपण काय घेऊन जातो हे महत्वाचे आहे विद्यार्थ्यांनी सर्व गोष्टीमध्ये शाश्वत विचार आणि विकास करावा विद्यार्थ्यांनी या वयापासूनच आर्थिक व्यवस्थापन करायला शिकले पाहिजे. नकारात्मक गोष्टीपासून सकारात्मक विचार करायला राष्ट्रीय सेवा योजना शिकवते असे मत प्रसाद मते यांनी मांडले. आपल्या दिवसाची विभागणी तीन विभागात करून तणावमुक्त जीवन जागा त्यासाठी आपल्या आवडीच्या कामात आपले करियर घडवा, नियमित योग आणि वाचन करा आणि दररोज नव नवीन कौशल्य शिका असा मोलाचा सल्ला मते यांनी दिला. ते आदर्श गाव वाघोली येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलत होते. न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे या वर्षीचे श्रमसंस्कार शिबीर आदर्श गाव वाघोली येथे मंगळवार दि. ७ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत पार पडले. या शिबिराचा समारोप आज सोमवार रोजी सकाळी १०.०० वाजता अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहसेक्रेटरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंतराव वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला.
या विशेष श्रमसंस्कार शिबिरातच आपल्या सुप्तगुणांची ओळख आपल्याला होते व आपला आत्मविश्वास, जिद्द व आपल्या विचारांची उंची वाढते. आपण जिद्दीने काम करून आपल्या कामात समाधानी राहण्याचा संदेश जयंतराव वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्वयंसेवकांना दिला. या प्रसंगी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सदस्या निर्मलाताई काटे यांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांचे आदर्श गावचे कौतुक केले.
आदर्श गाव वाघोलीचे संकल्पक उमेश भालसिंग यांनी या सात दिवसातील श्रमसंस्कार शिबिरात आलेले अनुभव सांगून स्वयंसेवकांचे कौतून केले. गावातील, स्मशानभूमीतील स्वच्छता, गावातील मंदिर साफसफाई, पथनाट्य, व्यायाम, कवायती, प्रधामिक शाळेतील गोबर गॅस प्रकल्प, मोहगनी, पिंपळ, बांबू अशा १००० झाडांची लागवड करून झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक बसविण्यात आले असे विविध उपक्रमाचे या सात दिवसाच्या श्रमसंस्कार शिबिरामध्ये राबविण्यात आले असे अहवाल वाचनातून कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप मिरे यांनी सर्वांसमोर मांडले. या शिबिरास गावातील ग्रामस्थ ,जिल्हा परिषद शाळा, सरपंच, उपसरपंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी उत्कृष्ठ काम करणारे ग्रुप व स्वयंसेवक आणि स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला. यात तृतीय क्र. संघमित्रा वाघमारे, द्वितीय क्र. साक्षी काथवटे, प्रमथ क्र. धनश्री लांडे या स्वयंसेविकांना मिळाला तर तृतीय क्र. प्रणव देशमुख, द्वितीय क्र. हर्षल डांगरे, प्रथम क्र. योगेश मुंगसे या स्वयंसेवकांना मिळाला. पथनाट्य तृतीय क्र. एकता ग्रुप (मोबाईलचे दुष्परिणाम), द्वितीय क्र. वृक्षवल्ली ग्रुप (कॅन्सर मुक्त भारत), प्रथम क्र. सत्यमेव जयते ग्रुप (मोबाईलमुळे हरवलेले बालपण) तर उत्कृष्ट श्रमदान तृतीय क्र. नवी उमेद, द्वितीय क्र. मिसळ ग्रुप, प्रथम क्र. वसुंधरा ग्रुप, आणि उत्कृष्ट अहवाल आणि सर्वेक्षण यामध्ये संघर्ष ग्रुपला बक्षीस मिळाले.
या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभाचे स्वागतपर मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांचे कौतुक केले. यात स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा उल्लेख केला व सर्वांचे कौतुक केले. याप्रसंगी लांडे धनश्री संतोष, साक्षी संजय काथवटे आणि हर्षल डांगरे व ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ जमदाडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. सिनियर विद्यार्थी काळे, अक्षय शिंदे, सोमेश्वर शेळके, आचारी मामा देवढे, ड्रायवर अनिल सुपारे मामा संजू भाऊ शेळके प्रमुख डॉ संदीप मिरे, डॉ गोकुळ क्षीरसागर, डॉ छाया भालशंकर यांचे या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, कार्यक्रम अधिकारी डॉ. छाया भालशंकर, डॉ. रवींद्र वैद्य, प्रा. मिनाक्षी चक्रे, प्रा. नारायण गोरे, आदर्श गाव वाघोलीचे संकल्पक उमेश भालसिंग, सरपंच सुस्मिता भालसिंग, उपसरपंच मोहन गवळी, ग्रामसेविका फाटले मॅडम तंटा मुक्ती समिती अध्यक्ष सुभाष नाना दातिर, १२५ स्वयंसेवक व स्वयंसेविका व महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. या समारोप समारंभाचे सूत्रसंचालन सोमेश्वर शेळके व पूजा शित्रे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ गोकुळ क्षीरसागर यांनी मानले. अँक्टिव्ह मराठी न्यूज शेवगाव. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे