Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसामाजिक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी, खो खो, कुस्ती, व्हॉलीबॉल या चार स्पर्धांच्या आयोजनासाठी आता १ कोटींचा निधी – *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत घोषणा.

पुणे जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे मराठी न्यूज. बारामती पुणे

0 1 4 7 2 7

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी, खो खो, कुस्ती, व्हॉलीबॉल या चार स्पर्धांच्या आयोजनासाठी आता १ कोटींचा निधी
– *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत घोषणा*

बारामती प्रतिनिधी- १६ डिसेंबर २०२५ बारामती- राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र क्रीडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे आयोजित केलेल्या २३ व्या ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १५ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला . उद्घाटन समारंभावेळी, स्पर्धेत सहभागी खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक, कबड्डी रसिकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आयोजित होणाऱ्या कबड्डी, खो खो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे ७५ लाख रुपयांचे अनुदान वाढवून ते १ कोटी करण्याची घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या घोषणेमुळे देशी खेळांच्या प्रचार-प्रसार आणि खेळाडूंच्या विकासाला अधिक बळ मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या घोषणेचे क्रीडा जगतातून स्वागत होत आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आणि आयोजक सचिव बाबुराव चांदोरे, यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे