बारामती नगर परिषद शाळा क्रमांक ४. प्रवेशव्दार लगत अस्वच्छता. शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात.
विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.पुणे.

बारामती नगर परिषद शाळा क्रमांक ४. प्रवेशव्दार लगत अस्वच्छता. शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात.

बारामती प्रतिनिधी:-२१ जानेवारी२०२५ बारामती शहरातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक-४उर्दु शाळेच्या प्रवेश दाराजवळ तंबाखू व गुटखा खाऊन थुंकी टाकल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. शहरातील अनेक मुले या शाळेत शिक्षणासाठी येतात. प्रवेशद्वार लगत अस्वच्छता असल्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी व्यक्त केली आहे. सामान्य कुटूंबातील मुले या शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे शाळेच्या स्वच्छतेबाबतीत नगरपालिका उदासीन असल्याचे मत पालक व्यक्त करीत आहेत . नगरपालिका मुख्याधिकारी शिक्षणअधिकारी यांनी तातडीने याबद्दल कारवाई करावी. शाळेच्या आवारामध्ये. सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.
जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.







