Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

बारामती ई-पिंक रिक्षासाठी राष्ट्रवादी कार्यालयात महिलांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात.

पुणे जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज.बारामती.पुणे.पु

0 1 4 7 2 7

बारामती ई-पिंक रिक्षासाठी राष्ट्रवादी कार्यालयात महिलांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात*
बारामती प्रतिनिधी:-२१ जानेवारी २०२५ गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत पिंक ई रिक्षा योजना राबविण्यास सुरुवात केली आहे…या नुसार बारामती शहर राष्ट्रवादी कार्यालय, शारदा प्रांगण या ठिकाणी गरीब,गरजू महिलांसाठी पिंक ई रिक्षा या योजनेचा फॉर्म भरून देण्याचं काम सुरू आहे. शहरातील महिला मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत असून, त्यांना निश्चित या योजनेचा लाभ मिळेल,
शिवाय त्यातून त्या आत्मनिर्भर होतील, स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होतील, अशी माहिती महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांनी दिली.
ई-पिंक रिक्षा या योजनेत महिला लाभार्थीला भरावयाच्या १० टक्के रकमेतील ३७,३०० रुपयांऐवजी सुरुवातीला १२,३०० रुपयेच भरवायचे आहेत.त्यामुळे याचा लाभ अनेक गरीब गरजू महिलांना होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा अनिता गायकवाड यांनी केले आहे.
जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे