अचानकपणे केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बारामती नगर परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण.
प्रतिनिधी सुयश बगाडे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती

अचानकपणे केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बारामती नगर परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण.
बारामती (प्रतिनिधी) दि.२४ जानेवारी २०२५
बारामती शहरातील एमआयडीसी परिसरातील सुभद्रा मॉल समोरील अतिक्रमण नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सूचना देताच नगरपालिकेने काढून तातडीची कारवाई केली होती. त्या कारवाईत हातावर पोट असणाऱ्या दुकानदार यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बारामती एम.आय.डी.सी. रोडच्या बाजूला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून सदर व्यवसायावर त्यांचेे कुटुंब अवलंबून आहे. बारामती नगर परिषदेमार्फत पथ (फुटपाथ) मार्गावारील हातगाडे व्यवसाय करणारे यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे पथविक्रेते यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान देखील झाले आहे .सदर व्यवसाय बंद झाल्याने त्यांचा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर व्यवसायासाठी त्यांनी पतसंस्था तसेच छोट्या मायक्रो फायनान्स मधून कर्ज घेतले आहेत. सदर कर्जाचा डोंगर त्यांच्यावर आहे. मोठी रक्कम गुंतवून फुटपाथवर बांधलेले दुकान ते घेऊ शकत नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. त्यांनी बारामतीकर म्हणून नेहमी खासदार मा.शरदचंद्र पवार
यांना साथ दिली आहे तसेच, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार,खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांना मतदान करून निवडून दिले आहे. तरी त्यांच्या पोटाचा प्रश्न सत्ताधारी तसेच प्रशासन यांनी लवकरात लवकर मार्गी लावून पर्यायी दुकानासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी उपोषणकर्ते करत आहेत. बारामती प्रतिनिधी सुयश बगाडे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.







