Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय मांजरी येथील विद्यार्थ्यांचे पडवी येथील विशेष हिवाळी शिबिर …..

0 1 4 7 2 7

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय मांजरी येथील विद्यार्थ्यांचे पडवी येथील विशेष हिवाळी शिबिर …..

(ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी.पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोद शितोळे. दिनांक 25.1.2025 ते 28 .1. 2025 दरम्यान संपन्न होत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे 50 स्वयंसेवक व स्वयंसेविका या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. ग्रामीण भागातील समस्या समजून घेणे व उपाय शोधणे आरोग्य शिबिर राबवणे ,मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्प व उपक्रम राबवणे, पर्यावरण संवर्धन, वृक्षरोपण व स्वच्छता मोहीम राबविणे ही या शिबिराचे उद्दिष्टे आहेत.
याच शिबिरादरम्यान दिनांक 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पडवी गावातील आईचा माळा या ठिकाणी पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक संकलन स्वच्छता वृक्ष संवर्धन व वृक्षरोपणाचे कार्यक्रम राबविले यानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना चे पन्नास स्वयंसेवक व स्वयंसेविका सहभागी होते. यानिमित्त स्वयंसेवकांनी प्लास्टिक कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावणे वृक्ष संवर्धनासाठी स्वच्छता करणे इत्यादी कामे केली. यावेळी त्यांचे मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार प्राध्यापक डॉ.आर. के. मोजे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका सौ. नैना सोनावणे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ.एस .ए .पाटील , प्राध्यापक दत्तात्रय मुळे , प्राध्यापक आर. वाय पवार ,प्राध्यापिका सुषमा कांबळे, प्राध्यापिका एस .एम. बनकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या सेक्रेटरी पूजा भामे व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रेसिडेंट दीपक शिरसाठ यांनी केले होते. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे