38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रा.डॉ.नागनाथ गजमल यांची नियुक्ती
वसमत..(प्रतिनिधी) . विभागीय संपादक अनिल कुमार मुकुटकर. दिनांक २५ जानेवारी

38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रा.डॉ.नागनाथ गजमल यांची नियुक्ती
वसमत..(प्रतिनिधी) . विभागीय संपादक अनिल कुमार मुकुटकर. दिनांक २५ जानेवारी

28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान नैनिताल , उत्तराखंड येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यामध्ये 38 क्रीडा प्रकारात संपूर्ण भारतातील जवळपास 10000 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला खो-खो संघ सहभागी होणार असून महाराष्ट्र खो-खो संघाचे प्रशिक्षक म्हणून वसमत जि. हिंगोली येथील बहिर्जी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नागनाथ गजमल यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे तीन वेळेस स्वामी रामानंद विद्यापीठाचे मुला मुलीचे संघाचे अनेक वेळेस मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे . तसेच अनेक खेळाडू विद्यापीठ पातळीवर व महाराष्ट्राच्या संघामध्ये निवडीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.
या निवडी बद्दल बहिर्जी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, उपाध्यक्ष मुंजाजीराव जाधव साहेब, सचिव पंडितराव देशमुख सर,ऍड.रामचंद्र बागल साहेब व विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार श्री. राजूभैया नवघरे साहेब, बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एम. जाधव, उपप्राचार्य डॉ.एम.डी. स्वामी, प्रा.नवनाथ लोखंडे, प्रा.करुणा देशमुख, प्रा. राजकुमार इंगळे, प्रा. सोनाजी पतंगे, प्रा.प्रदीप जाधव, प्रा. अनिल नांदरे, प्रा.अनिल मुगुटकर, डॉ.पांडूरंग बर्वे, हिंगोली जिल्हा खो खो असोसिएशन चे अध्यक्ष तथा शिवेश्वर नागरी सहकारी बँक वसमतचे अध्यक्ष श्री शिवदास बोड्डेवार, जिल्हा खोखो संघटनेचे उपाध्यक्षा मनीषा काटकर, उपाध्यक्ष संदीप सोनी, शिवाजी कट्टेकर, प्रा.मिनानाथ गोमचाळे, बालासाहेब कोसलगे, प्रवीण शेळके,अमोल मुटकुळे,प्रा.आनंद भट, प्रा.हेमंत शिंदे प्रा.निरंजन आकमार, नाना शिंदे, सुरज शिंदे, मनोजकुमार टेकाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ब्युरो रिपोर्ट,अनिल मुगुटकर, एक्टिव मराठी न्युज, वसमत, हिंगोली.







