Breaking
ब्रेकिंग

M S E D C L मिटर रीडर कंत्राटी कामगार यांच्या वतीने हिंगोली येथे अधिक्षक अभियंता विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाल, उपविभागीय कार्यालय,व शहरी पोलीस स्टेशन वसमत येथे निवेदन सादर करण्यात आले*

जिल्हा प्रतिनिधी रवीं कुंटे ॲक्टिव्ह मराठी न्यूज वसमत हिंगोली

0 1 4 7 2 7

*M S E D C L मिटर रीडर कंत्राटी कामगार यांच्या वतीने हिंगोली येथे अधिक्षक अभियंता विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाल, उपविभागीय कार्यालय,व शहरी पोलीस स्टेशन वसमत येथे निवेदन सादर करण्यात आले*

हिंगोली (ॲक्टिव्ह मराठी) जिल्हा प्रतिनिधी – रवि कुंटे दिनांक 3 फेब्रुवारी. संपूर्ण महाराष्ट्राभर फॉल्टी मिटर च्या जागी स्मार्ट मिटर प्रिपेड मिटर बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे मिटर रिडिंग घेणारे व विज बिल वितरण कामगारांवर येणाऱ्या काळात उपासमारीची वेळ येईल.आम्ही शासनास व महावितरण ला उपोषण च्या माध्यमातून निवेदन दिले व आमची मागणी स्मार्ट मिटर लागल्यावर शासनाने आम्हाला वयाच्या साठ वर्षे होईपर्यंत शासनाने रोजगाराची शास्वती द्यावी. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात ऊर्जा मंत्री यांना निवेदन दिले असता परंतु त्यांनी सांगितले की, एक महिना नंतर संघटनेसी चर्चा करु परंतु अद्याप ही त्यांनी चर्चेला बोलावले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मिटर वाचक रिडरनां आंदोलना शिवाय पर्याय उरलेला नाही. महावितरण व शासन जोपर्यंत मिटर रिडिंग व बिल वाटप करणारे कामगार यांच्याशी चर्चा होत नाही, तो पर्यंत काम बंद आंदोलन राहिल सदर दिनांक-4 फेब्रुवारी 2025 पासून वसमत उपविभागीय कार्यालया समोर काम बंद धरणे आंदोलन राहिल. त्यामुळे शासन व महावितरण यांच कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले तर MSEDCL मिटर रीडर कामगार संघटनेला वेठिस धरु नये असे निवेदनावर या वेळी नमुद करण्यात आलं आहे.

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे