घरपट्टी व नळपट्टी ची जोमाने वसुली करणाऱ्या राहुरी नगरपरिषद हद्दीतच येत आहे नळाला दूषित पाणी . नागरिकांच्या आरोग्यास धोका व आजाराचे प्रमाण वाढले…
तालुका प्रतिनिधी दीपक साळवे अँक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी

घरपट्टी व नळपट्टी ची जोमाने वसुली करणाऱ्या राहुरी नगरपरिषद हद्दीतच येत आहे नळाला दूषित पाणी . नागरिकांच्या आरोग्यास धोका व आजाराचे प्रमाण वाढले…
राहुरी (अँक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी. दिनांक 3 फेब्रुवारी .राहुरी शहरातील राहुरी नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वैजिनाथ मंदिर जंगम गल्ली या पूर्ण परिसरातील पिण्याचे पाणी अतिदूषित व दुर्गंधीयुक्त हे नळाद्वारे येत आहे. असे प्रकारचे पाणी हे गेल्या आठ दिवसांपासून येत असल्यामुळे नागरिकामध्ये चिंता व्यक्त केली जातं आहे. अशा प्रकारच्या पाण्या मुळे लहान मुलांमध्ये व वयोवृद्ध नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढू शकते याच अनुषंगाने आज दिनांक 3/2/2025 रोजी शहरातील काही नागरिकांनी राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना लेखी निवेदन दिले आहे.व लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करून शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे. या निवेदनावर. माजी नगरसेवक सुनीलनाना ठकाजी पवार.गोविंद परशुराम इंगळे. पराग वर्धमान पारख.मनोज नामदेव आंबीलवादे. प्रतीक शांतीलाल बाफना. आकाश रासकर.व इतर नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत. सध्या राहुरी नागरपरिषदे कडून पाणी पट्टी व घरपट्टी वसुली जोमाने चालू असून ज्या प्रकारे वसुली साठी नगरपरिषदेणे अधिकारी व कामगाराची नेमणूक केली आहे त्याच प्रकारे शहरातील समस्यांचे निवांरण करन्या साठी सुद्धा नेमणूक करावी असे वयक्तिक मत हे निवेदन देताना राहुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुनील नाना ठकाजी पवार यांनी व्यक्त केले आहे.दिपक साळवे अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी.







