राहुरी पोलिसांची पोलीस स्टेशनच्याच पोलीस कर्मचाऱ्यांच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेटची कारवाई ..
जिल्हा प्रतिनिधी डॉ. देवेंद्र शिंदे ॲक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी अहिल्यानगर

राहुरी पोलिसांची पोलीस स्टेशनच्याच पोलीस कर्मचाऱ्यांच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेटची कारवाई ..
.
राहुरी (ॲक्टिव्ह मराठी) जिल्हा प्रतिनिधी . डॉ. देवेंद्र शिंदे. दिनांक 3 फेब्रुवारी. राहुरी पोलीस स्टेशन ने विना नंबर प्लेट कारवाई करून चोरीचे वाहन पकडण्याची मोहीम राबवली होती.
परंतु पोलिसांच्याच गाडीला फॅन्सी नंबर प्लेट असल्याची तक्रार राहुरी पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाल्याने ट्राफिक पोलीस हवालदार बापू फुलमाळी येणे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेटची कारवाई करून एक हजार रुपये दंड आकारून सदर दंड भरून घेतला व एक आदर्श प्रस्थापित केला. तसेच सदर गाडी पोलीस स्टेशन येथे आणून तिच्यावर प्रमाणित नंबर प्लेट बसून घेतल्यानंतर गाडी संबंधित अमलदाराच्या ताब्यात देण्यात आली.सदर कारवाईचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांकडून अभिनंदन करून स्वागत केले. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी..







