Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

हिंगोली जिल्हा आर्य वैश्य महासभा नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड.

विभागीय संपादक अनिल कुमार मुगुटकर अँक्टिव्ह मराठी न्यूज.वसमत.हिंगोली.

0 1 4 7 2 7

हिंगोली जिल्हा आर्य वैश्य महासभा नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड.

वसमत. (प्रतिनिधी)…. दिनांक 7 फेब्रुवारी
आर्य वैश्य महासभा हिंगोली जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्ष पदी हिंगोली येथील गिरीश विजयकुमार गुंडेवार, सचिवपदी आनंद चंद्रशेखर निलावार तर कोषाध्यक्ष पदी ऍड अशोक डूब्बेवार सह नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. हिंगोली येथील आर्य वैश्य समाज भवनात ६फेब्रुवारी रोजी आर्य वैश्य महासभा हिंगोली जिल्हा शाखेच्या सदस्य समवेत महासभा समन्वयक सर्वश्री प्रदीप कोकडवार,प्रा.डाॅ.अनिल मुगुटकर, श्री ज्ञानेश्वर मामडे,ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ,मावळते अध्यक्ष सचिन गुंडेवार,आदी उपस्थित होते.प्रा डॉ मुगुटकर ह्यांनी सदरील सभा ही नूतन कार्यकारिणी निवडी साठी असून मागील कार्यकारिणीचा कार्य काळ संपुष्टात आल्याने आयोजित केलीआहे असे सांगून महासभेच्या कार्या बद्दल माहिती दिली. नूतन कार्यकारिणीची निवड करावी त्या साठी सूचक अनुमोदक ह्यांनी नाव सुचवावे आणि सर्वांनी निवड मान्य असल्याचे जाहीर सांगावे असे प्रदीप कोकडवार ह्यांनी आवाहन केलं.त्यानुसार अध्यक्ष पदासाठी गिरीश गुंडेवार ,सचिव पदासाठी आनंद निलावार,कोषाध्यक्ष पदासाठी विधीज्ञ अशोक डूब्बेवार ह्यांची बिनविरोध निवड झाली. महाभेच्या इतिहासात प्रथमच जिल्हा कार्याध्यक्षपदी बाळापूर येथील समाजसेवक महेश गोविंदवार उपाध्यक्ष पदी वसमत येथील श्री श्यामसेठ डिगुळकर व श्री आतिष डुब्बेवार व श्री सचिन कोटलवार ह्यांची सर्वानुमते निवड झाली. निवड झाल्यानंतर नूतन पदाधिकारी आणि सदस्यांना मंचावर विराजमान करण्यात आले.मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकारी आणि सदस्याचां सत्कार करण्यात आला.उर्वरित कार्यकारिणी निर्मिती चे अधिकार नूतन अध्यक्ष,सचिव व कोषाध्यक्ष ह्यांना सर्वानुमते देण्यात आले.ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार, ह्यांनी बिनविरोध निवडणूक प्रक्रिया संपन्न केल्या बद्दल सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे मंचावरील समन्वयक , मान्यवर आणि नूतन कार्यकारिणी चे अभिनंदन केले.समारोपीय भाषणात समन्वयक प्रदीप कोकडवार ह्यांनी सर्वांनी एकदिलाने काम करावं असं आवाहन केलं व आर्यवैश्य महासभा नांदेड द्वारे आयोजित माजी मंत्री आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार ह्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात दि. 11फेब्रुवारी मंगळवारी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.नूतन कार्यकारिणीत समाविष्ट सर्वांचा सत्कार, मंचावरिल मान्यवरानी केला व प्राप्त कार्यकाळात आर्य वैश्य समाजाच्या सर्व धार्मिक सामाजिक आणि राष्ट्रीय उपक्रम राबवावेत अस आवाहन केलं.गिरीश गुंडेवार ह्यांनी आपल्या नूतन टीम च्या माध्यमातून ऐतिहासिक नोंदी सह कामगिरी बजावणार असा संकल्प जाहीर करून नूतन टीम ने आपला अमूल्य वेळ समाज कार्यासाठी द्यावा अस आवाहन केलं. सुत्रसंचलन आशिष पिंगळकर,तर आभार आनंद निलावार ह्यांनी मानले. वसमत व आखाडा बाळापूर येथील पदाधिकारी निवडीसह संपूर्ण कार्य कारिणी लवकरच आम्ही जाहीर करू असे जिल्हाध्यक्ष गिरीश गुंडेवार ह्यांनी सांगितले.
ब्युरो रिपोर्ट , अनिल मुगुटकर, अँक्टिव्ह मराठी न्युज ,वसमत, हिंगोली .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे