Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

सिकोकाई इंडियाच्या वतीने काराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न..

विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज बारामती पुणे

0 1 4 7 2 7

*सिकोकाई इंडियाच्या वतीने काराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न*
बारामती प्रतिनिधी:७ फेब्रुवारी २०२५ सेकोकाई कराटे इंडिया असोसिएशनच्या वतीने व बारामती कराटे क्लबच्या माध्यमातून कलर बेल्ट परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या. सदर स्पर्धा ११ गटांमध्ये ६७ खेळाडूंची कलर बेल्ट परीक्षा घेण्यात आली. यापैकी २७ खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी दाखवल्याने त्यांना गोल्ड, सिल्वर व ब्राँझ पद देण्यात आले. यशिता तुपे हिने येलो बेल्ट परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने परीक्षकांनी तिला ऑरेंज बेल्ट प्रदान केला त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर स्पर्धा स्वामी विवेकानंद हॉल अशोक नगर, बारामती या ठिकाणी घेण्यात आली होती. स्पर्धा होताच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव, भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष तैनुर शेख, युथ व्हिजन चे अध्यक्ष विशाल मेहता, माहिती अधिकार संघाचे प्रचार प्रमुख भास्कर दामोदर, यांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल व बेल्ट प्रदान करण्यात आले. परीक्षक म्हणून सिकोकाई सातारा जिल्ह्याचे प्रशिक्षक नवनाथ लवंगिरे, व सुशांत पोल, यांनी काम पाहिले सर्व यशस्वी खेळाडूंना बारामती कारटे क्लबचे प्रमुख प्रशिक्षक शिहान मिननाथ, रमेश भोकरे, कराटे क्लास इन्वार्ज व महिला प्रशिक्षिका सौ. शुभांगी भोकरे, सह-प्रशिक्षित मंथन भोकरे, कु. श्रुती भारकड व रेवा भारकड यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे