श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न*.
विभागीय संपादक : अनिल कुमार मुगुटकर अँक्टिव्ह मराठी न्यूज. वसमत. हिंगोली

*श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न*.

वसमत…प्रतिनिधी… दिनांक 19 फेब्रुवारी
येथील बॅंक काॅलनी मधील गजानन महाराज मंदिर येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
येथील स्थानिक रहिवासी बांधवांनी साधारण चाळीस वर्षेपुर्वी गजानन महाराज मंदिर ऊभारणी केली. तेव्हा पासून दरवर्षी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. येथे गजानन महाराज मुर्ती सोबतच विठ्ठल रखुमाई व शारदा मातेच्या सुंदर व सुबक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. आषाढी, कार्तिकी एकादशी तसेच नवरात्रात येथे महिला मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.मागील दोन वर्षेपासुन दर गुरुवारी संध्याकाळी दानशुर भक्त मंडळी तर्फे आरती व नंतर महाप्रसाद दीड दोन हजार भाविकांना वाटप करण्यात येत आहे. यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
तसेच दरवर्षी येथे गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.मोठ्या संख्येने भाविक भक्तांच्या उपस्थितीत आरती करण्यात येऊन महाप्रसाद वाटप करण्यात येतो. यावर्षी सुध्दा दिनांक 20 फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रगट दिन असुन, या निमित्ताने महिला मंडळातर्फे सौ.निलीमाताई बीडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय गजानन विजय ग्रंथाचे पारायण सोहळा आयोजित करण्यात आला. यासाठी जवळपास दिडशे महिला पुरुष भक्तांनी सहभाग नोंदविला. आज या पारायण सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी सहभागी सर्व भक्तांना यमुना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सिताराम म्यानेवार यांच्या हस्ते शाल , आसन व ट्राॅफी देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आकर्षण सिताराम म्यानेवार यांची चंद्रा ही गाय ठरली.पारायण सुरू असताना या गायीने शांतपणे पारायण श्रवण केले.आरती नंतर उपस्थित सर्वांना भोजन प्रसाद देण्यात आला व नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
ब्युरो रिपोर्ट,अनिल मुगुटकर, अँक्टिव्ह मराठी न्युज, वसमत, हिंगोली.







