सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती पाटेगाव यांच्या वतीने शालेय मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती पाटेगाव यांच्या वतीने शालेय मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम.
कर्जत (प्रतिनिधी रोहिदास तांदळे ) पाटेगाव :-पाटेगाव (कर्जत )येथे जि. प. प्राथमिक शाळेत राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती साजरी करण्यात आली.
प्रथमता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण व्याख्यानकर्त्या सौ. शुभांगीताई माने यांचे व्याख्यान झाले व यानंतर गावातील काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेतील मुलांना अल्प आहाराचे वाटप केले.या शुभ प्रसंगी उपस्थित गावचे सरपंच सौ. जान्हवीताई रवी शेवाळे ग्रामपंचायत सदस्य मा. नामदेव लाड, शंकर लाड, शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष बाळासाहेब भंडारे, सोसायटी चे सदस्य मा. परशुराम लाड, बाळासाहेब तांगडे, राम लाड, गणेश लाड,शेखर लाड,बाळू जाधव, भागवत महारनवर व सर्व शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती चे इतर सदस्य उपस्थित होते. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.







