रेल्वे ची नीलगायला जोरदार धडक; नीलगाय थेट विद्युत वाहिनीच्या तारेवर, दोन तास रेल्वे सेवा ठप्प.
जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे. अँक्टिव्ह मराठी न्यूज वसमत हिंगोली

रेल्वे ची नीलगायला जोरदार धडक; नीलगाय थेट विद्युत वाहिनीच्या तारेवर, दोन तास रेल्वे सेवा ठप्प

विभागीय हिंगोली प्रतिनिधी – रवि कुंटे हिंगोली/वसमत जुनूना रेल्वे स्टेशन जवळील अचानकपणे लोहमार्ग रेल्वे रुळावर आलेल्या नीलगाईस रेल्वे ची जबरदस्त धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की, नीलगाय हवेत म्हणून चक्क रेल्वेच्या विद्युत तारेवर अडकली. यामुळे अकोला ते पुर्णा लोहमार्ग वरील रेल्वे सेवा विस्कळित झाली होती. नीलगायला विद्युत वाहिनीच्या तारेवरून काढे पर्यंत रेल्वे सेवा ठप्प झाली होती.
ही घटना आज सकाळी घडली, आज सकाळी पूर्णा ते अकोला पुर्णा रेल्वे अकोल्याकडे मार्गस्थ होती.
वसमत तालुक्यातील जुनूना रेल्वे स्टेशन जवळील परीसरात अचानक रूळावर आलेल्या नीलगाईस रेल्वे इंजिनची जबरदस्त धडक बसली. जोरदार धडकेने नीलगाय चक्क हवेत उंच उडून समोरील रेल्वे विद्युत तारेवर जाऊन अडकली. यामुळे या लोहमार्ग वरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती.
दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी च्या साह्याने विद्युत वाहिणीवर अडकलेल्या नीलगाईस खाली काढण्यात आले. त्यानंतर पुर्णा येथून निघालेली रेल्वे अकोल्याकडे मार्गस्थ झाली. परिणामी पुर्णा ते अकोला व अकोला ते पुर्णा अशी रेल्वे क्रॉसिंग हिंगोली येथे नियमितपणे ती आज सकाळी बोल्डा रेल्वे स्टेशन वर झाली. तसेच या लोहमार्गा वरील रेल्वे गाड्या दोन तास उशिराने धावल्या, यामुळे रेल्वे प्रवाशांना ञास सहन करावा लागला. दरम्यान पुर्णा ते अकोला रेल्वे मार्गावर अपघाच्या घटनेत वाढ झाली असल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी याच लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या सोबतच छोटे मोठे वन्यजीव देखील रेल्वेला धडकून जखमी झालेल्या अवस्थेत मृत्यूमुखी पडत असतात.







