Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

दौंड शहरात विविध संघटनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या थाटात साजरी….

विभागीय संपादिका ज्योती मोकळ अँक्टिव्ह मराठी न्यूज दौंड

0 1 4 7 2 7

दौंड शहरात विविध संघटनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या थाटात साजरी….

दौंड (ॲक्टिव्ह मराठी) विभागीय संपादिका: ज्योती मोकळ. दिनांक २० फेब्रुवारी.छत्रपती शिवाजी महाराज जयंती दौंड शहर जनकल्याण संघ अखिल भारतीय ग्राहक पंचायत व लोक कल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी…
मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला,
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र भगत साहेब पोलीस उपनिरीक्षक दौंड यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,दिपक म्हस्के, साहेब यांनी केले, प्रास्तविक,सौ, ज्योती ताई मोकळं अध्यक्ष दौंड तालुका, यांनी केले,
कार्यक्रमाचे शिवव्याख्याते,श्री, प्रमोद शितोळे, तालुका अध्यक्ष, म्हणाले की, हिंदवी स्वराज्यासाठी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज साडेतीन शे वर्षापासून आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तव्य वीर पुत्र मिळाला, सतत लढा देण्यासाठी अखंड भारतातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राजे
सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला
आता घेऊनी तलवार शत्रूवर गर्जला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील माहिती व मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, दीपक मस्के आपल्या भाषणावेळी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी कार्यकर्त्यांनी व मस्के साहेबांनी घोषणा दिल्या, उपस्थितीत होते शिवजयंतीच्या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते श्री मच्छिंद्र भगत पोलीस उपनिरीक्षक दौंड, श्री प्रमोद शितोळे दौंड तालुका अध्यक्ष श्री दीपक राव मस्के साहेब प्रकल्प अधिकारी दौंड, सौ ज्योतीताई मोकळ दौंड शहर अध्यक्ष, श्री नामदेवराव जठार पाटील शहराध्यक्ष, श्री नामदेव राव होले मामा संघटक, सौ कौसर सय्यद दौंड शहर अध्यक्ष, श्री सुरेश लोंढे साहेब सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, शैलेश राव कदम कार्यकर्ते ग्राहक पंचायत, सौ बेगम ताई, सौ उज्वला साळवी व मान्यवर बहुसंख्येने शिवभक्त मावळे उपस्थितीत होते. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. दौंड.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे