Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंग

बारामतीतील घटना आठ वर्षे गरीब युवकाला चोप ह.भ.प. महाराजा कडून चोप..

कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज बारामती. पुणे

0 1 4 7 2 7

 

बारामतीतील घटना आठ वर्षे गरीब युवकाला चोप ह.भ.प. महाराजा कडून चोप..

बारामती (प्रतिनिधी)5 मार्च २०२५-बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत ही घटना घडली असून, फिर्यादीचा नातू व आरोपीची मुलगी एका
अंथरूणात आढळल्याने मुलाला मोबाईलचे चार्जरने
मारहाण केली, गुप्तेंद्रीयावर तिखट लावले अशी फिर्याद
बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर
पोलिसांनी अँट्रोसिटी व BNS-118 (1), बाल न्याय कायदा (जे. जे. ॲक्ट 72 (1)),मुलांची काळजी आणि सं अधिक 2015, अँट्रोसिटी कलम 3(1) (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील फिर्यादी महिलेने फिर्याद दिली असून त्यावरून
डोर्लेवाडीतील आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल
केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ची घटना घडली. २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी फिर्यादी ही डोर्लेवाडी येथे
गेली असता, फिर्यादीचा नातू मोठमोठ्याने रडू लागला.
फिर्यादी महिलेने त्याच्याशी संवाद साधला असता, त्या नातूने तो त्याच दिवशी दुपारच्या वेळी आरोपीच्या मुलीसोबत एका अंथरुणात झोपलेला आढळला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने पाठीवर, पोटावर व डाव्या हाताच्या दंडावर मोबाईलच्या चार्जरच्या वायरने मारहाण केली. तसेच अवघड जागेवर लाल तिखट लावले व तिखट खाण्यास दिले अशी माहिती दिली.
त्यावरून फिर्यादी महिलेने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली बारामती शहर पोलीसांना फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी वरीलगुन्हा दाखल केला आहे. याचा तपास उपविभागीयपोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत. जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे