ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
मांगवीर महामोर्चा मध्ये सहभागी व्हा… सकल मातंग समाज बैठकीमध्ये आमदार सुनील कांबळे यांचे आवाहन…
प्रतिनिधी कीर्ती लोंढे सह पश्चिम विभागीय संपादिका मातंगी वाघमारे अँक्टिव्ह मराठी न्यूज पुणे

0
1
4
7
2
7
मांगवीर महामोर्चा मध्ये सहभागी व्हा…
सकल मातंग समाज बैठकीमध्ये आमदार सुनील कांबळे यांचे आवाहन…
मातंग समाजामधील वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने मांगवीर महा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये आपल्याच समाजाचे प्रश्न मांडले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता सदर मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे.” असे आवाहन आमदार सुनील भाऊ कांबळे यांनी सकल मातंग समाजाने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये केले. ते पुणे बिबवेवाडी येथील यशराज हॉलमध्ये संपन्न झालेल्या बैठकीमध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि पुणे जिल्हा महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष सुभाष जगताप साहेब होते.
सदर बैठकीमध्ये आजी-माजी आमदार व मंत्री तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या संघटनेचे नेतेही उपस्थित होते. सदर बैठक यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सकल मातंग समाजाचे समन्वयक अशोक भाऊ लोखंडे, भास्कर भाऊ नेटके आणि अनिल हातागळे अशा अनेक सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी कीर्ती लोंढे सह पश्चिम विभागीय उपसंपदिका मातंगी वाघमारे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. पुणे,

0
1
4
7
2
7







