Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

जगणे ते होते सुंदर* सांगीतीक अनुभूतीचे आयोजन.

संपादक उमेश साठे ॲक्टिव्ह मराठी न्यूज.अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

जगणे ते होते सुंदर*
सांगीतीक अनुभूतीचे आयोजन.

अहिल्यानगर (ॲक्टिव्ह मराठी), दिनांक 5 मार्च 2025.

प्रख्यात साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या कविता आणि संत कबीर यांच्या कालातीत रचनांच्या गायनाची सुरेल मैफल येत्या शुक्रवारी, दिनांक 7 मार्च 2025 रोजी स्नेहालय संस्थेत
आयोजिण्यात आली आहे.
हार्मनी – द परफेक्ट ट्यून यांची प्रस्तुती असणारा हा कार्यक्रम
स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे सायंकाळी 5.30 वाजता होईल.
ही अनोखी मैफल निःशुल्क आणि सर्वांसाठी खुली आहे.
कबीर पद गायन* आणि डॉ. अवचट यांच्या कवितांचे गायन कविता खरवंडीकर करतील.
त्यांना तबल्याची साथ धनंजय आणि हार्मोनियम साथ मकरंद खरवंडीकर करणार आहेत.
*जगणे ते होते सुंदर*, हा डॉ.
अवचट यांच्या कवितांचा दृकश्राव्य माध्यमातून सांगीतिक आविष्कार प्रथमच होत आहे. यामध्ये पुणे येथील प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी आणि श्रुती खरवंडीकर यांची साथ लाभली. या मैफलीची संकल्पना,
निर्मिती आणि निवेदन खरवंडीकर दांपत्य करणार आहेत.
प्रसिद्ध संगीतकार आणि सामाजिक जाणीव जपणारे मानसग्राम प्रकल्पाचे आधारस्तंभ मानसोपचार तज्ञ डॉ.नीरज करंदीकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी 7620431413
येथे संपर्काचे आवाहन संस्थेने केले आहे..
संपादक : उमेश साठे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्या नगर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे