Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

मनोरमा मेमोरियल हायस्कूलच्या सभागृहात महिला दिनानिमित्त – माजी विद्याथि॓नी सत्कार समारंभ व पालकांसाठी पारंपारिक वेषभूषा स्पर्धांचे आयोजन.

ग्रामीण विभागीय संपादिका दिपाली दिवेकर पुणे

0 1 4 7 2 7

मनोरमा मेमोरियल हायस्कूलच्या सभागृहात महिला दिनानिमित्त – माजी विद्याथि॓नी सत्कार समारंभ व पालकांसाठी पारंपारिक वेषभूषा स्पर्धांचे आयोजन.

दौंड (ॲक्टिव मराठी )प्रतिनिधी. ग्रामीण विभागीय संपादिका  दिपाली दिवेकर.
दिनांक ८ माच॓ २०२५ – महिला दिनाचे औचित्य साधून मनोरमा शाळेत विविध कार्यक्रम राबविण्यात आले . पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या डॉक्टर अजिता कुबेरजी यांनी काय॓क्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्थान भूषविले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुचिता शिंदे यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांनी महिलांनी आपले आरोग्य कसे जपावे, महिलांनी स्वतःला कसे सक्षम बनवावे याबाबत मार्गदर्शन केले.
सौ. अनुपमा वाणिया यांनी महिला दिनाची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या व आपल्या क्षेत्रात आपली कर्तव्ये , चोख कामगिरी पार पाडणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. परिचारिका, वकील, डॉक्टर, इंजिनिअर ,पोलीस, सोशल वर्कर या क्षेञात उत्तम कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनीचा महिला दिनाचे औचित्य साधून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूति॓च्या उपस्थितीमुळे व त्यांनी आपल्या जडण घडणीत शालेय शिक्षणाचा व संस्कारांचा कसा वाटा आहे याचे अनुभव कथनामुळे सभागृहात उपस्थित विद्यार्थ्यांनी व पालकवग॓ भारावून गेला. महिला पालकांसाठी विविधरंगी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषेसोबत त्यांनी आत्मविश्वासाने रॅम्पवॉक केला . या संधीचा उपयोग करून उपस्थित माजी विद्यार्थिनीदेखील रॅम्पवॉक करून बालपणातील आठवणीना उजाळा दिला. पारितोषिक वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शालेय सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी श्रीमती शीतल चोपडे , श्रीमती आशा भोसले, श्रीमती दिपाली शिंदे व सौ. अनुपमा वाणिया यांनी काय॓क्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दिपाली शिंदे यांनी केले. अँक्टिव्ह मराठी न्यूज दौंड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे