Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

गुंज गावावर शोककळा. सात महिला मजुरांचा मृत्यु .

ब्युरो रिपोर्ट अनिल कुमार मुगुटकर सह विभागीय संपादक ज्ञानेश्वर कोसलगे. अँक्टिव्ह मराठी न्यूज. वसमत. मुकुटकरसंपादक

0 1 4 7 2 7

गुंज गावावर शोककळा. सात महिला मजुरांचा मृत्यु .

वसमत.( प्रतिनिधी).दिनांक 5 एप्रिल वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे हळद काढणी कामासाठी जात असताना त्यांना घेऊन जाणारा ट्रँक्टर विहिरीत पडून सात महिलांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण बचावले आहेत. त्यात दोन महिला व एक पुरुष आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे.

आज सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आलेगाव येथे हळद काढणीसाठी महिला मजुर ट्रॅक्टर ट्राॅली मध्ये बसुन जात होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरील वाहन विहिरीत कोसळले.यामध्ये ताराबाई सटवाजी जाधव (३५), ध्रुपता सटवाजी जाधव (१८), सरस्वती लखन बुरड (२५), सिमरन संतोष कांबळे (१८), चउत्राबाई माधव पारधे (४५), ज्योती इरबाजी सरोदे (३५) सपना तुकाराम राऊत (२५) यांचा मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले आहेत.
घटनास्थळी आमदार श्री राजु भैय्या नवघरे, वसमत तहसील प्रशासन, पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत सर्व सहाय्य उपलब्ध करून दिले. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.अनेकांनी या बचाव कार्यात मदत केली.
या दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असुन मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे.
अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्रध्दांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे.
ब्युरो रिपोर्ट,अनिल मुगुटकर, सह विभागीय संपादक ज्ञानेश्वर कोसलगे.अँक्टिव्ह मराठी न्युज, वसमत, हिंगोली.

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे