Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

बहिर्जी महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या अमोनिया गॅस सेन्सर संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त….

ब्युरो रिपोर्ट अनिल कुमार मुगुटकर. अँक्टिव्ह मराठी न्यूज.वसमत.

0 1 4 7 2 7

*बहिर्जी महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या अमोनिया गॅस सेन्सर संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त*…

वसमत…. प्रतिनिधी… दि.6 एप्रिल.स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ अंतर्गत विवीध महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापकांंनी एकञ येवून केलेल्या संशोधनास नुकतेच आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले आहे. स्वारातीम विद्यापीठाचे प्रा डॉ राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली, बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमतचे प्रा डॉ अनिल मुगुटकर व त्यांचे सहकारी संशोधक प्रा डॉ संतोष जाधव, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख, डीएसएम महाविद्यालय, जिंतुर, प्रा. डॉ राजाराम माने, माजी संचालक, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्र, स्वारातीम विद्यापीठ नांदेड, प्रा डॉ श्याम गोरे, डीएसएम महाविद्यालय, जिंतुर ,डॉ विजयकुमार जाधव, शिवाजी काॅलेज, उदगीर, प्रा डॉ उमाकांत तुंबरफळे, नांदेड , डॉ शोएब मोहम्मद शेख, सौदी अरेबिया , प्रा विजयपाल वाढवे, माहुर यांनी केलेल्या या नाविन्यपूर्ण संशोधनाला नुकतेच जर्मनी या देशाने आंतरराष्ट्रीय पेटंट म्हणून मान्यता दिली आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे दुसरे पेटंट आहे. नॅनो संमिश्रा पासुन तयार केलेल्या नवीनतम पदार्थाचे हे गॅस सेन्सर असुन अमोनिया हा विषारी वायु शोधणे व त्याची तीव्रता मोजणे तसेच भविष्यातील अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी याचा उपयोग होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या गॅस सेन्सरचा उपयोग फर्टिलायझर इंडस्ट्री,डंपिंग ग्राऊंड, प्रयोगशाळा, सेप्टीक टँक, पब्लिक युरिनल्स, स्वच्छता गृहे ई. ठिकाणी होऊ शकतो. भविष्यात नवीन संधीची दारे यामुळे खुली होतील अशी माहिती डॉ अनिल मुगुटकर व सहकारी संशोधकांनी दिली.

बहिर्जी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांनी सदरील नाविन्यपूर्ण संशोधनाची संपुर्ण माहिती घेत मार्गदर्शन केले व अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच बहिर्जी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री मुंजाजीराव जाधव साहेब, सचिव श्री पंडितराव देशमुख सर , श्री रामचंद्रराव बागल साहेब व सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातुन त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र. कुलगुरु डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मा. मा. जाधव , डि. एस. एम. महाविद्यालय जिंतुर चे प्राचार्य डॉ . भोंबे , भौतिकशास्त्र विभागप्रमुख श्री कल्याणकर सर यांनी तसेच सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा डॉ अनिल मुगुटकर यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. ॲक्टिव्ह मराठी न्यूज वसमत. हिंगोली.

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे