Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

केडगाव येथील आर्ट अँड मोशन डान्स स्टुडिओ मुलींनी ओडिसा मध्ये उंचावला महाराष्ट्राचा झेंडा..

प्रतिनिधी.राहुल अवचट अँक्टिव्ह मराठी न्यूज.यवत.

0 1 4 7 2 7

केडगाव येथील आर्ट अँड मोशन डान्स स्टुडिओ मुलींनी ओडिसा मध्ये उंचावला महाराष्ट्राचा झेंडा..

यवत (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी .राहुल अवचट दि.8 एप्रिल.ओडिसा राज्यातील जिल्हा संस्कृती परिषद जगतसिंगपूर यांनी आयोजित केलेल्या गौरवशाली विरासत, संस्कृती, कला आणि संस्कृतीचे प्रतीक जगतसिंगपूर जिल्हा महोत्सव नवकृष्ण चौधरी स्टेडियम इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

यावेळी केडगाव येथील आर्ट अँड मोशन डान्स स्टुडिओ मुलींनी ओडिसा मध्ये बहारदार लावणी नृत्य सादर करत महाराष्ट्राचा झेंडा उंचावला .
एक एप्रिल ते पाच एप्रिल या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमांमध्ये एकूण १२ राज्यातील विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या वतीने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या केडगाव येथील आर्ट अँड मोशन डान्स स्टुडिओ च्या मुलींना संधी देण्यात आली होती. या मुलींनी महाराष्ट्राचे वतीने लावणी हे लोक नृत्य सादर केले, पारंपारिक पद्धतीने परिधान केलेला पोषक यांसह बहारदार व उत्कृष्ट असे नृत्य सादर केल्यामुळे महाराष्ट्राच्या टीमला सन्मानित करण्यात आले यासाठी प्रशिक्षक सागर रोकडे, रॉबिन मंगलम, तेजस्विनी साळुंखे, धनराज मासाळ यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र टीमला लाभले असून उपासना मासाळ, साक्षी शेंडगे, विभावरी तांबे, राशी कटारिया, कार्तिकी नेवसे, श्रावणी वाघ, वृणाली मुथा, अंकिता कुलथे, यांसह राज नराळे,साहिल गायकवाड, कुणाल विटकर यांनी महाराष्ट्राच्या वतीने लावणी लोकनृत्य सादर केले अँक्टिव्ह मराठी न्यूज.यवत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे