महात्मा फुले सभागृह व सभामंडपाचे भूमिपूजन खासदार सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती पुणे

महात्मा फुले सभागृह व सभामंडपाचे भूमिपूजन खासदार सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

बारामती (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी:-२३ एप्रिल २०२५ बारामती शहरामधील आमराई या ठिकाणी महात्मा फुले सोसायटीमध्ये सभागृह व सभामंडपाची मागणी बऱ्याच वर्षापासून येथील रहिवाशांची होती या मागणीला अखेर यश मिळाले. स्थानिक नगरसेविका अनिता(ताई) दिनेश जगताप यांनी वारंवार याचा पाठपुरावा करून अखेर काम मार्गी लावले खासदार सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते या सभागृह व सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. या साठी १.कोटी रुपयांचा निधी या कामासाठी नगरपरिषद बारामती यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी बारामती नगर परिषदचे मुख्याधिकारी पंकज भुसे. राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शहरध्यक्ष जय पाटील, कैलास चव्हाण, भारत अहिवळे, आप्पा अहिवळे, नवनाथ बल्लाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड, अभिजीत चव्हाण,ॲड. सुशील अहिवळे, विशाल जाधव, आप्पा अहिवळे, संतोष सातव, राजेंद्र सोनवणे, साधू बल्लाळ, गजानन गायकवाड, अरविंद बगाडे, शुभम अहिवळे, मंगेश गिरमे, शुभम मोरे, मल्लिकार्जुन हिरेमठ, बापू झांबरे, निलेश धुमाळ, महेश राजगे, फिरोज शेख, या सर्व मान्यवरांच्या व स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.
पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.







