Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

माजलगाव शहरांमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये नागरिकांनी वर्गणी करून टाकला नाली वर पुल…

माजलगाव (अँक्टिव्ह मराठी) न्यूज. किसन बी पवार

0 1 4 7 2 7

माजलगाव शहरांमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये नागरिकांनी वर्गणी करून टाकला नाली वर पुल…

माजलगाव (अँक्टिव्ह मराठी) न्यूज. किसन बी पवार माजलगाव प्रतिनिधी दिनांक.30.05.2025.माजलगाव नगरपरिषद ला भिक लागल्यामुळे व माजलगाव चे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके हे टक्केवारी खाण्यात व्यस्त असल्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मधल्या नागरिकांनी वर्गणी करून पुल टाकले….माजलगाव प्रतिनिधी… माजलगाव च्या बिलाल मोहल्ला येथे शिवाजी भाऊ राजवण हे नगरसेवक असताना त्यानी संतोष भैय्या वाल्मिक यांच्या घरापासून ते अतिक किराणा दुकान यांच्या दुकाना समोर रुन दोन्ही बाजुने नाली आणि सिमेंट रस्ते व काही ठिकाणी पुल टाकले होते पण त्या नंतर बरेच नगरसेवक झाले परंतु त्यांनी स्वतःचे घर भरून घेतले पण एक भी नालीवरती पुल नाही टाकले नाही बिलाल मोहल्ला तील नागरिकांनी अनेक वेळा निवेदन नगर परिषद ला दिले पण यांच्या काहीच फायदा झाला नाही शेवटी नागरिकांनी विस हजार रुपये वर्गणी करून नालीवर पुल टाकला माजलगाव नगर परिषदला भिक लागल्यामुळे व माजलगाव चे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके हे फक्त आणि फक्त टक्के वारी खान्यावरच आहे त्यांना माजलगाव च्या जनतेची कांहीं घेणे देणे नाही फक्त स्वतची तिजोरी भरण्यासाठी त्यांना वेळ आहे पण जनतेची कामे करण्यासाठी त्यांना वेळ नाही इलेक्शन आले की प्रकाश सोळंके हे प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांना खोटे आश्वासन देतात आम्ही निवडून आल्यावर तुमच्या गल्लीत रोड करू प्रत्येक गल्लीत लाईट चे पोल उभा करू आठवड्या तुन दोन दा नळाला स्वच्छ पाणी पुरवठा देऊ पण माजलगावच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये एकही नाली वरती पुल नाही लाईट चे पोल नाही पंधरा दिवसाला एक दा नळाला घाण पाणी येत आहे आणि लोकांना येण्या जाण्यासाठी व लहान लहान मुलांना येण्या जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे म्हणून बिलाल मोहल्ला येथील एक ते दोन ठिकाणी नागरिकांनी वर्गणी करून पुल टाकले आहे..11=6=2023 रोजी प्रकाश सोळंके यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत 5 कोटी ची निधी चे उद्घाटन केले होते त्या नंतर अजुन एक दा 7 कोटी चे उद्घाटन करण्यात आले पण कामे काहीच करण्यात आले नाही उलट लोकांना अंधारात मोठ्या कसरतीने घरापर्यंत जावा लागत आहे प्रकाश सोळंके यांनी ही निधी कोणाच्या खिशात घातली हे प्रकाश सोळंके यांनी जनतेला सांगावे आणि आपण 5 कोटी निधी मध्ये कोण कोणते कामे केली आहेत ते पण पत्रकार परिषद मध्ये आपण जाहीर पणे सांगावेत अशी मागणी प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांची आहे… नस्ता नगर परिषद च्या निवडणुकीच्या टायमाला नागरिक आपल्याला प्रभाग क्रमांक 7 मध्ये फिरू देणार नाहीत अँक्टिव्ह मराठी न्यूज. माजलगाव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे