Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वसमत येथे वसमत भुषण पुरस्कारांचे थाटात वितरण. समारंभ संपन्न

वसमत. (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी. जिल्हा विभागीय उपसंपादक अनिल कुमार मुगुटकर....

0 1 4 7 2 7

वसमत भुषण पुरस्कारांचे थाटात वितरण

वसमत. (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी. जिल्हा विभागीय उपसंपादक अनिल कुमार मुगुटकर….
येथे सुरू असलेल्या वसुमती महोत्सव कार्यक्रमात आज तिसऱ्या दिवशी वसमत भुषण पुरस्कारांचे एका शानदार समारंभात वितरण करण्यात आले.
श्री राजु भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वसुमती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन दिनांक ९ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता नव्याने लोकार्पण झालेल्या चौगुले सांस्कृतिक सभागृहात हा सोहळा संपन्न झाला.
वसमत विधानसभा क्षेत्रातील आरोग्य, साहित्य, शिक्षण, क्रीडा ,अध्यात्म, कृषी ,पर्यावरण, समाजकारण, उद्योग ,पत्रकारिता ,राजकारण, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार वितरण करण्यात आले. सर्व पुरस्कारार्थी यांनी केलेले कार्य वसमत तालुक्याचा लौकिक वाढविणारे असल्याचे प्रतिपादन आमदार श्री राजु भैय्या नवघरे यांनी यावेळी मनोगतातून व्यक्त केले.
श्री अच्युत महाराज दस्तापुरकर ,श्री जयप्रकाशजी मुंदडा, डॉ इंद्रजीत भालेराव, श्री कैलास देसाई, प्रा हरिभाऊ रावळे ,सनाऊल्ला खान, स्व.उत्तम दादा दगडु ,गंगाधर जाधव ,साहेबराव चव्हाण ,महिला बचत गट ,मंगेश दळवी ,अरुण नादरे इत्यादी मान्यवरांना वसमत भुषण पुरस्कार, मानपत्र व रोख अकरा हजार रुपये तर श्री प्रकाश आमटे यांना मानपत्र, रोख एकावन्न हजार देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वसमत विधानसभा क्षेत्रातील विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आम्हाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असुन पुढील कार्यासाठी नवीन ऊर्जा या पुरस्काराने मिळाली असल्याची प्रतिक्रिया पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी प्रतिनिधी जवळ व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ता हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ काशीनाथ चव्हाण, मानपत्राचे वाचन डॉ कुंटे, प्रा तोलमारे, पोटे सर तर आभार प्रदर्शन सेवा प्रतिष्ठानचे बालु मामा ढोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी महिला, पुरुष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे