Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

जागतिक स्किझोफ्रेनिया जागृती दिनी प्रत्येक, स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णापर्यंत उपचारांसह पोहोचण्याचा संकल्प . जागतिक स्किझोफ्रेनिया जागृती सप्ताहास येत्या 24 मे पासून आरंभ होत आहे.

संपादक उमेश साठे अँक्टिव्ह मराठी न्यूज

0 1 4 7 2 7

जागतिक स्किझोफ्रेनिया जागृती दिनी
प्रत्येक, स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णापर्यंत उपचारांसह पोहोचण्याचा संकल्प .

जागतिक स्किझोफ्रेनिया जागृती सप्ताहास येत्या 24 मे पासून आरंभ होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील
प्रत्येक स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णापर्यंत उपचारांसह पोहोचण्याचा संकल्प
मानसग्राम प्रकल्पाने केल्याची माहिती प्रकल्पातर्फे देण्यात आली.

अहिल्यानगर.इसळक (अँक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी दि. 22 (ता., जि. नगर ) येथे मागील पाच वर्षांपासून मानसिक आरोग्यावरील बहुउद्देशीय स्वरूपाचा मानसग्राम प्रकल्प स्नेहालय संस्था साकारत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मालेगाव, बीड या जिल्ह्यात रस्त्यांवर बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या
स्किझोफ्रेनियाग्रस्त तुकड्यांना आधार आणि उपचार दिले जातात. अशा सुमारे 600 स्त्री व पुरुष रुग्णांना निवासी उपचार देऊन त्यांच्याच कुटुंबात पुनर्वशीत करण्यात आले आहे. भारताच्या विविध राज्यांसह नेपाळ आणि बांगलादेश मध्येही रुग्णांचे परिवार त्यासाठी शोधण्यात आले.
यंदाच्या जागतिक स्किझोफ्रेनिया जागृती सप्ताहाच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील
ग्रामीण भागात मानसिक आजारांपैकी स्किझोफ्रेनिया बद्दल विशेषत्वाने जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
सुमारे दहा लाख नागरिकांपर्यंत स्किझोफ्रेनिया बद्दलची माहिती पथनाट्य, प्रबोधन व्याख्याने, पत्रकांचे वाटप , समाज माध्यमे आणि अन्य माध्यमांचा उपयोग करून मानसग्राम पोहोचविणार आहे.
या निमित्ताने मानसिक उपचारांनी बऱ्या झालेल्या आणि सन्मानित जीवन जगणाऱ्या जुन्या रुग्णांचा मेळावा, रुग्णाच्या उपचारात कुटुंबाची भूमिका या विषयावरील चर्चासत्र,
चित्र प्रदर्शनी त्यांचेही आयोजन करण्यात आले आहे.

*संकल्प ते सिद्धी*
मानसग्राम प्रकल्पाची पायाभरणी २५ डिसेंबर २०२० रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ. भरत वटवाणी यांच्या प्रेरणेने झाली. मानसोपचार तज्ञ डॉ. नीरज करंदीकर यांनी यातील वैद्यकीय उपचारांची धुरा सांभाळली.
क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट सौ. दीप्ती करंदीकर, डॉ. मेघना मराठे , ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर थेरपीस्ट. डॉ. वृषाली सरोदे, पुणे येथील तज्ञ समुपदेशक दीपा राक्षे आणि माइंडफुलनेस थेरपिस्ट सौ. आसावरी गुपचूप यांचे या प्रकल्प विकासात योगदान लाभले.
*2 वर्षे मोफत उपचार*
संपूर्ण बऱ्या झालेल्या रुग्णाला घरी पाठवल्यानंतर त्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना पुढील 2 वर्षांपर्यंत मोफत औषधे त्यांच्या घरी पाठवली जातात. आजपर्यंत १५५० रुग्णांना घरपोच औषध सेवा पुरविण्यात आली आहे. तसेच, महिन्यातून दोन वेळा रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली जाते. मोबाईल द्वारे वेळोवेळी आणि तात्काळ समुपदेशन आणि मदत दिली जाते .
स्नेह मनोयात्री प्रकल्पाच्या उभारणीमधील पहिला टप्पा 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होत आहे. त्यानंतर एकावेळी स्किझोफ्रेनिया ग्रस्त
200 मानसिक रुग्णांवर येथे निवासी उपचार केले जातील, अशी माहिती मानद संचालक डॉ. नीरज करंदीकर यांनी दिली .
मानसग्राम प्रकल्पातील रुग्ण भाजीचे उत्पादन, दुग्ध उत्पादन इत्यादी उत्पादक कामात सहभागी होतात. उपचारात घेऊन बरे झालेल्या, परंतु कुटुंबात स्वीकृती नसलेल्या रुग्णांसाठी एक समूह घर पुढील वर्षी साकारले जाणार आहे.
येत्या 24 मे रोजी सर्व नागरिकांना मानसग्राम पाहण्यासाठी खुले राहणार असल्याचे समन्वयक रमाकांत दोडी , प्रवीण मृत्याल यांनी कळवले आहे.
रमाकांत दोड्डी .प्रकल्प व्यवस्थापक मो.
९०११००५००६ अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे