Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

चंद्राच्या वाढदिवसानिमित्त सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन.

ब्युरो रिपोर्ट अनिल मुगुटकर, सह जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटेअँक्टिव्ह मराठी न्युज, वसमत, हिंगोली.

0 1 4 7 2 7

चंद्राच्या वाढदिवसानिमित्त सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन*

वसमत. प्रतिनिधी.
येथील नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री सिताराम म्यानेवार व त्यांच्या परिवारातील एक सदस्य तथा सर्वांची लाडकी गोमाता अर्थात चंद्रा हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त म्यानेवार परिवारातर्फे दिनांक २४ मे शनिवारी गोमाता पुजन व विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
साधारण एक वर्षापुर्वी चंद्राचे म्यानेवार परिवारात आगमन झाले तेंव्हा पासून आजपर्यंत या परिवारातील एक सदस्य म्हणून ती प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत आहे. परिवारातील सर्व सदस्य तिची प्रेमाने काळजी घेतात.तिच्या आंघोळीची , जेवणाची, झोपण्याची इ सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. चंद्रा प्रयागराज येथे आयोजित कुंभमेळ्यात हजेरी लावून आली आहे. तसेच शहरातील विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सव, पारायण यासाठी सुध्दा उपस्थिती लावली आहे.
बाहेरगावी जाण्यासाठी स्वतंत्र वाहन व चार माणसे सोबत असतात . पोथी, पारायण इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये चंद्रा मन लावून श्रवण करते. तसेच सर्व कार्यक्रमांमध्ये शिस्तीने सहभागी होते, त्यामुळे चंद्रा हा सर्वांसाठीच आपुलकीचा व कुतूहलाचा विषय ठरली आहे.
म्यानेवार परिवारातील सर्व सदस्य तिची अतिशय प्रेमाने काळजी घेत असून सर्वांना तिच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला आहे . अशा या गोमाता चंद्राच्या वाढदिवसानिमित्त यमुना प्रतिष्ठान वसमत व म्यानेवार परिवारातर्फे वेदमूर्ती श्री उमेश महाराज टाकळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोमाता पूजन व विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व भाविक भक्तांनी व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यमुना प्रतिष्ठान,म्यानेवार परिवार व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे .
ब्युरो रिपोर्ट अनिल मुगुटकर, सह जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटेअँक्टिव्ह मराठी न्युज, वसमत, हिंगोली.

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे