Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

प्रति वार्षिक 10 दिवसीय निवासी याज्ञिक प्रशिक्षण शिबीर आयोजित.

उत्तर विभागीय उपसंपादक प्रशांत जोशी अँक्टिव्ह मराठी न्यूज.

0 1 4 7 2 7

प्रति वार्षिक 10 दिवसीय निवासी याज्ञिक प्रशिक्षण शिबीर आयोजित.

ॲक्टिव्ह मराठी न्यूज. प्रतिनिधी-नाना जोशी राहुरी …
नाशिक शहरातील नावजलेली श्री ब्रह्मचैतन्य याज्ञिक पाठशाळा नाशिक यांच्यावतीने 24-5-2025 रोजी प्रति वार्षिक याज्ञिक शिबीर 2025 कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी नवीन पौरोहित्य शिकण्यासाठी प्रति वार्षिक 10 दिवसीय याज्ञिक शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात मे 2024 या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये भारतातील मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश,बेंगलोर,दिल्ली या राज्यातून व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व ब्राह्मण समाज बांधवांनी सहभाग नोंदवला होता,त्या शिबीरास उत्तुंग आसा प्रतिसाद मिळाला.त्यामुळे ह्यावर्षी 25 मे ते 3 जून 2025 या दहा दिवसाच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीरात नवीन पौरोहित्य करणार्यांना यामध्ये त्रिकाल संध्याविधी,यज्ञोपवीतधारण विधी,भोजन विधी,गणपती अथर्वशीर्ष, श्री सुक्त,पुरुषसोक्त,शिवमहिम्न स्त्रोत्र,सत्यनारायण पूजन, नवग्रह मंत्र,सर्व देवता अभिषेक घरचे कुलधर्म कुलाचार कसे करावेत याची शास्त्रोक्त पद्धतीने शुध्द माहिती दिली गेली. या शिबीरात विविध विषयांवर नामांकित तज्ञ गुरुजींचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे.या शिबीराला कोणतीही वयाची अट नाही.या दहा दिवसासाठी शुल्क मात्र 8100 रु घेण्यात आले. या शुल्कामध्ये निवास,एक वेळ नाश्ता, तीन वेळेस चहा,दोन वेळेचे भोजन व आवश्यक नोट्स या गोष्टीचा सामावेश आहे.या शिबीराचे वैशिष्ट्य म्हणजे ब्राह्मण समाजातील अधिकाधिक विद्यार्थी शास्त्रीय पौरोहित्यकडे वळावेत व आपला हा वैदिक ठेवा जतन करावा हा या शिबीराचे मुळ उदिष्टे आहे. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.

2.5/5 - (2 votes)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे