भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता राखून मोबदला वितरण तातडीने करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील* *सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न*
अँक्टिव्ह मराठी न्यूज.

*सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न*
अहिल्यानगर, दि. ८ : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून कामकाज करण्यात यावे. जमीन संपादन करताना संबंधित जमिनीबरोबरच त्या ठिकाणी असलेली झाडे, विहिरी, पाईपलाईन तसेच इतर मालमत्तांचे मूल्यांकन अचूक व निश्चित कार्यपद्धतीनुसार करण्यात यावे. मूल्यांकन प्रक्रियेत कोणतीही तफावत राहणार नाही व शासनाच्या निश्चित कार्यपद्धतीत कोणताही बदल होणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग निवाड्यांसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते.
बैठकीस जिल्हाधिकारी पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, माणिक आहेर, अरुण उंडे, किरण सावंत-पाटील, विशेष भूसंपादन अधिकारी अतुल चोरमारे, सायली सोळंके, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक मिलिंदकुमार वाबळे, व्यवस्थापक सत्यम राय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, महामार्गासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित जमिनीचे भूसंपादन तातडीने पूर्ण करण्यात यावे. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढावीत. जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्राप्त झालेला मोबदल्या







