
घरकुल लाभार्थ्यांची आर्थिक लूट थांबवा व लूट करणाऱ्या अधिकाऱ्याला तत्काळ बडतर्फ करा *कॉ.कृष्णा सोळंके*
माजलगाव (प्रतिनिधी > किसन पवार),
तालुक्यातील गेली अनेक महिन्यापासून केसापुरी सर्कल मधील महातपुरी,पुरुषोत्तम पुरी,सादोळा,मंजरथ,छत्र बोरगाव,आबेगाव व ईतर गावासाठी घरकुल अनुदानाला सुरवात झाली लोकांच्या खात्यावर पहिला टप्पा म्हणुन 15000 रु अनुदान शासनाने टाकले परंतु त्यानंतर 70000 रुपयाचा हप्ता मात्र टाकण्यासाठी 10-11 गावासाठी असणारे इंजिनियर श्री ज्ञानेश्वर जायभाये हे रोजगार सेवकांच्या मार्फत किंवा त्यांचा माणूस ठेवत किंवा ग्रामपंचायत चे कर्मचारी यांच्यावर दबाव टाकून किंवा त्यांच्या संमतीने हे इंजिनियर्स पैश्याची मागणी करतात परंतु ज्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता 15 हजार रुपयांचा पडला आहे ते मात्र यांना पैसे देत नाहीत आणि त्यांनी पैसे न दिल्यामुळे हे इंजिनिअर साहेब त्यांची जिओ टॅगिंग करत नाहीत आणि ही जि ओ टॅगिंग ते अनेक महिन्यांपासून करत नसल्यामुळे लाभार्थ्यांचे बांधकाम अपूर्ण आहे आता ते सांगताहेत की आम्हाला यांचा जिओ टॅगिंग करता येत नाही .असे बहाणे देऊन खऱ्या लाभार्थ्यांना हे वंचित ठेवण्याचे काम हे नामक श्री.ज्ञानेश्वर जायभाये अधिकारी करत आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांना आम्ही फोनद्वारे बोललो परंतु त्यांच्या आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या त्यामुळे त्यांचे पराक्रम आम्हाला दिसले आहेत तरी आज माजलगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी यांनी या अधिकाऱ्याची चौकशी करावी यासाठीचे निवेदन किसान सभेचे तालुका सचिव कॉ.कृष्णा सोळंके यांनी दिले आहे घरकुल पाहणी करण्यासाठी गावात येणारे इंजिनियर यांची कसून चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे अन्यथा सर्व लाभार्थ्यांना घेऊन आम्ही पंचायत समिती समोर असेल किंवा जिल्हा परिषद कार्यालय बीड येथे असेल ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावे लागेल आम्ही ते पाऊल उचलायला मागेपुढे पाहणार नाहीत .असा इशारा देखील आम्ही आज देत आहोत ,
घरकुलाचा उद्देश हा प्रत्येक नागरिकाला पक्के घर असावे हाच आहे आणि तो उद्देश पूर्ण करायचा असेल तर ज्या ज्या लाभार्थ्यांनी पक्के घर बांधले आहे त्यांना हे अनुदान द्यावे अशी देखील मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शाखा सादोळा च्या वतीने गटविकास अधिकारी माजलगाव यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदन दिले आहे, परंतु पुढे जो काही प्रकार आम्हाला दिसला त्यामुळे लोकांचे हप्ते रुकले आहेत आणि बांधकाम मात्र पूर्णत्वास गेले आहे असे निदर्शनात येत आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत इंजिनियर आहेत,







