Breaking
ब्रेकिंगसामाजिक

पुरुषोत्तमपुरीत गंगेत बुडून १३ वर्षीय आकाश चा मृत्यू

ॲक्टिव्ह मराठी न्यूज किसन बी पवार माजलगाव प्रतिनिधी.

0 1 4 7 2 5

पुरुषोत्तमपुरीत गंगेत बुडून १३ वर्षीय आकाश चा मृत्यू

ॲक्टिव्ह मराठी न्यूज किसन बी पवार माजलगाव प्रतिनिधी.:अधिकमास यात्रेनिमित्त भाविकांनी गजबजलेल्या पुरुषोत्तम पुरी येथे मंगळवार, १९ रोजी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. चिवडा व पेढे विक्री करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावणारा आकाश लक्ष्मण म्हेत्रे (क्य १३), रा. पाटील गल्ली, माजलगाव या अल्पवयीन मुलाचा गंगेत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. भाविकांसह स्थानिक नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.आकाश हा आपल्या कुटुंबासोबत अधिकमास यात्रेनिमित्त पुरुषोत्तम पुरी येथे वास्तव्यास होता. यात्रेदरम्यान तो चिवडा व पेढे विक्रीचे काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. सकाळी तो गंगेत आंघोळ करण्यासाठी गेला. पाण्याचा अंदाज प्रशासकीय अनास्थेचा बळी अधिकमास यात्रेत व्हीआयपींच्या स्वागतात दंग असलेल्या प्रशासनाने भाविकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली. नदीकाठी हजारो नागरिकांची गर्दी असतानाही साधे जीवरक्षक, बचाव नौका किंवा बॅरिकेडिंग नव्हते. यात्रेकरूंचे तोंड गोड करणाऱ्या १३ वर्षीय आकाशचा मृत्यू हा केवळ अपघात नसून, प्रशासनाच्या ढिसाळ आणि शून्य नियोजनाचा थेट परिणाम आहे न आल्याने तो खोल भागात गेला. तो बुडाला. काही वेळाने ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक व उपस्थित भाविकांनी तत्काळ धाव घेतली. मुलाचा शोध सुरू केला. बराच वेळ शोधमोहीम राबवल्यानंतर आकाशला पाण्याबाहेर काढण्य आले आहे. ॲक्टिव्ह मराठी न्यूज माजलगाव बीड.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे