Breaking
कृषीवार्ताब्रेकिंग

कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांचा मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर होतंय जाचं… राहुरी कृषी विद्यापीठ मध्ये मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर जातीभेद झालाय नगर जिल्ह्यात सुरू….

0 1 4 7 2 7

कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांचा मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर होतंय जाचं…

राहुरी कृषी विद्यापीठ मध्ये मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर जातीभेद झालाय नगर जिल्ह्यात सुरू….

राहुरी (प्रतिनिधी) दिनांक .१२ जुलै .कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांच्याकडून मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील दोन वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मिलिंद अहिरे व डॉ. दिनकर कांबळे हे सहकुटुंब दि. १० जुलै, २०२४ पासून कुलगुरू यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार बसले आहेत,
मागासवर्गीय अधिकारी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांची खोटी चौकशी लावलेली असून सेवा जेष्ठता डावलून आपल्या मर्जीतील कनिष्ठ अधिकांऱ्याना अतिरिक्त पदभार दिलेला आहे. डॉ. मिलिंद अहिरे हे मे. २००८ मध्ये प्राध्यापक झाले असून प्राध्यापकांच्या सेवा जेष्ठता यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत तर डॉ. दिनकर कांबळे हे सेवा जेष्ठता यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत.
कुलगुरूंचे निकटवर्तीय डॉ. महानंद माने हे २०१९ मध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण
कृषी विद्यापीठ, दापोली येथून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आले असून ते डॉ. मिलिंद अहिरे व डॉ. दिनकर कांबळे यांचेपेक्षा सेवाजेष्ठतेनुसार कनिष्ठ आहेत असे असतानाही त्यांना सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय, पुणे व प्राचार्य, उद्यानविद्या महाविद्यालय, पुणे हे पदभार मागील आठवड्यात देण्यात आले आहे, याशिवाय इतर काही कनिष्ठ सहयोगी प्राध्यापक तसेच प्राध्यापक यांना सहयोगी अधिष्ठाता पद देण्यात आले आहे.
मागासवर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळू नये यासाठी त्यांचे प्रस्ताव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन, परिषद यांच्याकडे पाठविण्यात आलेले नाहीत.
मा. कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील महाराष्ट्र शासन निर्णयात ५०:५० पदोन्नती व निवड अशी तरतूद असताना फक्त निवडीनेच विभाग प्रमुख व सहयोगी अधिष्ठाता हि पदे भरण्यासाठी सद्यस्थितीत तरतूदी विरोधात आग्रही आहेत. इतर कृषी विद्यापीठांनी पदोन्नतीचे आपले प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र महात्मा फुले कृषी विद्यापीठात सेवा जेष्ठता यादीत सर्व मागासवर्गीय अधिकारी असल्याने त्यांना या पदांपासून वंचित ठेवण्यासाठी कुलगुरू हे प्रस्ताव दाबून ठेवत आहेत. राहुरी प्रतिनिधी डॉक्टर देवेंद्र शिंदे ॲक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी. अहमदनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे