
शुन्य टक्के एनपीए असलेली एकमेव बॅंक ….श्री सुधाकर चिद्रवार

शुन्य टक्के एनपीए असलेली एकमेव बॅंक ….श्री सुधाकर[ चिद्रवार
वसमत.(प्रतिनिधी).१० नोव्हेंबर बॅंकींग क्षेत्रात सध्या भरपुर स्पर्धा सुरू झाली असून विविध योजनांची जाहिरातबाजी सुरू आहे. पण आमची कुणाशीही स्पर्धा नसुन उपलब्ध सेवा सुविधांचा दर्जा वाढविण्यावर आमचा भर असेल असे प्रतिपादन श्री सुधाकर चिद्रवार यांनी केले. आज वसमत मध्ये संपन्न झालेल्या वैश्य नागरी सहकारी बँकेच्या शुभारंभ कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. वसमत येथे एका भव्य कार्यक्रमात बॅंकेच्या नुतन शाखेचा शुभारंभ श्री बाळु गुरु असोलेकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
आर्थिक साक्षरते सोबत आर्थिक सुरक्षितता सुध्दा खुप महत्वाची आहे त्यामुळे ग्राहकांनी मागील २७ वर्षेपासुन अ वर्ग ऑडिटचा दर्जा प्राप्त असलेल्या वैश्य नागरी सहकारी बँकेच्या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ मा मा जाधव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास देशपांडे यांनी तर उपलब्ध सेवा सुविधांची माहिती स्थानिक सल्लागार समिती सदस्य प्रा डॉ अनिल मुगुटकर व डॉ लीना गुंडेवार यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी निवेदक सौ.कुंडेकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ रुपाली दलाल यांनी केले. कार्यक्रमासाठी वैश्य नागरी सहकारी बँक लि.परभणीचे उपाध्यक्ष श्री सुधीर अण्णा पाटील व सर्व संचालक तसेच माजी आमदार श्री मुंजाजीराव जाधव, अॅड. रामचंद्र बागल साहेब, श्री शिवदासजी बोड्डेवार , श्री सुभाष सेठ लालपोतु , श्री सत्यविजय अन्वेकर मामा, श्री लक्ष्मीकांत कोसलगे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, पत्रकार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध मान्यवरांनी बॅंकेच्या शाखेला सदिच्छा भेटी देऊन विविध योजनांची माहिती घेतली. वसमत शहरातील नागरिकांना रविवारी बॅंक सुरू ठेवुन बॅंकींग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री अभय कोसलगे यांनी सांगितले. शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट अनिल मुगुटकर, अक्टिव्ह मराठी न्युज,वसमत हिंगोली.







