आषाढी वारी करीता नगर तसेच इतर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांच्या दिंडया अहमदनगर शहरातुन जाणार असल्याने दिंडीमधील वारकऱ्यांचे सुरक्षेच्या कारणास्तव अहमदनगर – मनमाड रोडवरील विळद बायपास ते पुनतांबा फाटा पर्यंत वाहतूक नियमात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश*
आषाढी वारी करीता नगर तसेच इतर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांच्या दिंडया अहमदनगर शहरातुन जाणार असल्याने दिंडीमधील वारकऱ्यांचे सुरक्षेच्या कारणास्तव अहमदनगर – मनमाड रोडवरील विळद बायपास ते पुनतांबा फाटा पर्यंत वाहतूक नियमात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश*

*पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाची अंमलबजावणी दि.३०/०६/२०२४ रोजी रात्री ००.०५ वा. ते ०९/०७/२०२४ रोजी २४.०० वा. पावेतो राहील* ◀️
नगर:-
आषाढी वारी २०२४ करीता अहमदनगर तसेच इतर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांच्या दिंडया अहमदनगर शहरातुन जाणार आहेत. सदर दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होणार आहेत. सध्या नगर-मनमाड या महामार्गावरील पत्रकार चौक ते एसपीओ चौकादरम्यान रोडचचे कॉक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर असून सदर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तसेच सदर महामार्गावरुन अवजड वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु असते. सदर अवजड वाहनांचा दिंडीतील भाविकांना धक्का लागुन अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिंडीमधील वारकऱ्यांचे सुरक्षेच्या कारणास्तव अहमदनगर – मनमाड रोडवरील विळद बायपास ते पुनतांबा फाटा पर्यंत वाहतूक नियमात अहमदनगरचे जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी बदल केले आहेत.
त्यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन दि.३०/०६/२०२४ रोजी रात्री ००.०५ वा. ते ०९/०७/२०२४ रोजी २४.०० वा. पावेतो अहमदनगर मनमाड या महामार्गावरील विळद बायपास ते पुनतांबा फाटा पर्यंतची अवजड वाहतूक खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविणेबाबत आदेश पारीत करीत आहे.
> १) *अहमदनगरकडुन मनमाडकडे जाणारे जाणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग* –
*विळद बायपास – शेंडी बायपास नेवासा कायगाव गंगापुर वैजापुर येवलमार्गे – मनमाड कडे किंवा केडगाव बायपास – कल्याण बायपास आळेफाटा संगमनेर मार्ग नाशिककडे*
*> शनि शिंगणापुर/सोनई वरुन राहुरी मार्गे मनमाडकडे जाणारे जड वाहने अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरुन इच्छित स्थळी जातील* *देहरे – राहुरी कृषी विदयापिठ, राहुरी कडुन मनमाडकडे जाणारे जड वाहनांकरीता पर्वावी मार्ग श्रीरामपुर बाभळेश्वर निर्मळ पिंपरी बायपास मार्गे कोपरगाव येवला- मनमाडकडे*
२) *मनमाड कडुन अहमदनगरकडे येणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग*
*पुणतांबा फाटा – वैजापुर गंगापुर कायगाव नेवासा शेंडी बायपास विळद बायपास केडगाव बायपास > लोणी / बाभळेश्वर कडुन अहमदनगकडे येणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग बाभळेश्वर श्रीरामपुर टाकळीभान नेवासा मार्गे अहमदनगर कडे*
३) *मनमाड कडुन अहमदनगर मार्गे पुणे / मुंबई / कल्याणकडे जाणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग पुणतांबा फाटा झगडे फाटा सिन्नर नांदुर शिंगोटे संगमनेर आळेफाटा मार्गे*
*सदर वाहतुक वळविणेबाबतचा आदेश. दि. ३०/०६/२०२४ रोजी रात्री ००.०५ वा.ते०९/०७/२०२४ रोजी २४.०० वा. पावेतो जारीराहील*
प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, दिंडीमध्ये सहभागी असलेली वाहने व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणांस्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही. अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर अहमदनगर







