दांडेगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड 78,600/- रूपयांचा मुद्देमाल जप्त*
हिंगोली.(ॲक्टिव्ह मराठी न्युज). प्रतिनिधी.विभागीय जिल्हा प्रतिनिधी - रवि कुंटे हिंगोली.

*दांडेगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड 78,600/- रूपयांचा मुद्देमाल जप्त*
झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या दहा बहादरांना घेतले पोलिसांनी ताब्यात
हिंगोली.(ॲक्टिव्ह मराठी न्युज). प्रतिनिधी.विभागीय जिल्हा प्रतिनिधी – रवि कुंटे हिंगोली. जिल्ह्यातील अवैध धंद्याचा शोध घेऊन कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी सूचना दिल्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात एक पथक पोलीस स्टेशन बाळापुर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे मौजे दांडेगाव येथे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 10 झनमन्ना जुगारांना ताब्यात घेऊन रोख रक्कम व साहित्या सहित असा एकूण 78,600/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर छाप्यामध्ये जुगार खेळणारे इसम नामे. 1) कोंडूआप्पा मुंजाजी रंगखांब वय 60 वर्ष 2) कोंडीबा पिराजी नांदुरे वय 35 वर्ष 3) गोरखनाथ लक्ष्मण वावळे वय 42 वर्ष 4) मारुती जगदेवराव काळे वय 40 वर्ष 5) कृष्णा शंकरराव फुलारी वय 46वर्ष 6) अंबादास गोविंद बळवंते वय 40 वर्ष 7) महादू शामराव बळवंते वय 44 वर्षे 8) भाऊराव जोमाजी साखरे होय 38 वर्ष 9) शंकर गंगाधर चांदीवाले वय 45 वर्ष 10) नारायण नामदेवराव उन्हाळे वय 35 वर्षे सर्व राहणार दांडेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली हे मौजे दांडेगाव येथे गावठाण जमिनीतील मोकळ्या जागेत झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना स्थानिक गुन्हे शाखा व पो स्टे बाळापुर येथील पथकाने छापा मारून कार्यवाही करून पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील स्थागुशा , पोनि श्री विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलिस अमलदार गजानन पोकळे, नितीन गोरे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे, नरेंद्र साळवे, आकाश ठापरे, सुनील रिठे यांच्या पथकाने केली आहे. ॲक्टिव्ह मराठी न्युज. वसमत. हिंगोली.







