धनंजय देशमुख यांचे शोले स्टाईल आंदोलन मागे. जरांगे पाटलाच्या विनंतीवरून यांनी आंदोलन थांबवले…
जिल्हा विभागीय उपसंचालक किशन पवार ऍक्टिव्ह मराठी न्यूज बीड

धनंजय देशमुख यांचे शोले स्टाईल आंदोलन मागे.
जरांगे पाटलाच्या विनंतीवरून यांनी आंदोलन थांबवले…

(अँक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी किशन बी पवार बीड जिल्हा विभागीय उपसंचालक. दिनांक.13.01.2025. मस्साजोग धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर जाऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला परंतु जरांगे पाटलाच्या मध्यस्थीने अनर्थ ट ळला मनोज जरांगे पाटलांच्या गळ्यात पडून हंबरडा फोडला. पोलीस अधीक्षकावर फेकल्या बांगड्या धनंजय देशमुख मस्साजोग या गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती मस्साजोग गावातील पाण्याच्या टाकीवर चढून गावकऱ्याकडून आंदोलन करण्यात येत होते आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख यात सहभागी झाली होती धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन स्वतःला संपवण्याचा इशारा दिला होता चार तासानंतर धनंजय देशमुख यांना मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेतले आहे धनंजय देशमुख खाली येतात मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात पडून टाहो फोडला जरांगे पाटील यांनी त्यांना आधार दिला यावेळी सर्व गावकऱ्यां चे अश्रू अनावर झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कड क शिक्षा द्यावी त्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आंदोलन केले होते यावेळी सर्व गावकऱ्यांनी पूर्ण पाण्याच्या टाकीला घेरावा घातला होता पोलीस प्रशासन आम्हाला नीट माहिती देत नाहीत माझ्या पोलिसावर विश्वास नाही म्हणत धनंजय देशमुख यांनी आपल्याला जीवन संपवायचे आहे प्रशासनाला असा इशारा दिला होता यावेळी पोलीस अधीक्षक व जिल्हा अधीक्षक आंदोलन स्थळी दाखल झाले होते दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना फोनवरून संपर्क साधला असता त्यानंतर धनंजय देशमुख यांची मनधरणी करण्यात आली त्यानंतर पाण्याच्या टाकीवरून धनंजय देशमुख खाली उतरले मनोज जरांगे पाटील यांच्या मदतीने आंदोलन मागे घेण्यात आले.. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. बीड.







